Download App

रामाच्या अयोध्येत आलात मग, रिकाम्या हातानं जायचं नाही; पाहुण्यांना मिळणार अनोखी भेट

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. हा सोहळा भव्य दिव्य असाच होईल यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. या समारंभात देशभरातील साधू संत आणि प्रसिद्ध व्यक्तींसह समाजातील अन्य घटकांना जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रामजन्मभूमि ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 11 हजारांपेक्षा जास्त आमंत्रितांना कायम स्मरणात राहिल अशा भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

राम मंदिर ट्रस्टतर्फे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणारे पाहुणे आणि आमंत्रित केलेल्या सदस्यांना खास भेट देण्याची व्यवस्था केली जात आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिराचा पाया खोदताना निघालेली माती डब्यांत पॅक करून उपस्थितांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथे येणाऱ्या पाहुण्यांसठी ही भेट खासच राहणार आहे.

Ram Mandir : हिंदू कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला दोन तासांची विशेष सुट्टी : ‘या’ देशाची मोठी घोषणा

ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की पंतप्रधान मोदींना ज्यूटच्या पिशवीत भरलेला राम मंदिराचा 15 मीटरचा फोटो सादर केला जाईल. ट्रस्ट सदस्य म्हणाले, की प्राणप्रतिष्ठा समारंभात 11 हजारांहून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांना सदैव स्मरणात राहिल अशा भेटवस्तू देण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यांनी सांगितले की रामजन्मभूमीच्या मातीशिवाय देशी तुपापासून बनवलेले 100 ग्रॅम मोतीचूर लाडूही प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत.

रामललाच्या अभिषेकासाठी देशभरातून चार हजारांहून अधिक संतांनी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रजनीकांत, अभिनेत्री माधुरी दिक्षित यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त क्रीडा, साहित्य, विज्ञान यांसह विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोज संपूर्ण देश प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबरोबर जोडला जाणार आहे. देशभरातील मोठ्या मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Ram Mandir: साऊथ सुपरस्टार राम चरणला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; म्हणाला..

हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सुटी 

सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे.

follow us