खळबळजनक ! राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Expelled From Hinduism Shankaracharya Announcement : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून (Hindu Dharma) बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya) यांच्या भूमिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांना मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य भोवल्याचे सांगण्यात येत आहे. शंकराचार्य अविमुक्तेशवरानन्द सरस्वती यांनी म्हटलंय की, […]

Rahul Gandhi (2)

Rahul Gandhi (2)

Rahul Gandhi Expelled From Hinduism Shankaracharya Announcement : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून (Hindu Dharma) बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya) यांच्या भूमिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांना मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य भोवल्याचे सांगण्यात येत आहे.

शंकराचार्य अविमुक्तेशवरानन्द सरस्वती यांनी म्हटलंय की, राहुल गांधी हिंदु धर्मासंदर्भात चुकीची वक्तव्य करत आहेत. बलात्कार करणाऱ्याला संरक्षित करा, असं मनस्मृतीमध्ये लिहिलं गेलं नाहीये. ही बाब तुम्ही मनुस्मृतीचा हवाला देऊन चुकीची सांगत आहात. असे वक्तव्य करून मनुस्मृतीला बदनाम केलं जात असल्याचं देखील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलंय.

विरोधकांचे पक्ष फोडून त्यांना तुरुंगात टाकता; पाकिस्तानसमोर मात्र….राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घाव

सोबतच राहुल गांधी मनुस्मृतीच्या पुस्तकाला मानत नाहीत, असं देखील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. प्रत्येक हिंदू मनुस्मृतीला आपला धर्मग्रंथ मानतो, परंतु तुम्ही या ग्रंथाल आपलं मानत नाही, त्यामुळे तुम्ही हिंदू नाही. आम्ही त्यांना रिमायंडर दिलं, तरीदेखील राहुल गांधींनी मान्य केलं नाही. तीन महिने झाले आहेत. परंतु तरीही त्यांनी अजून आपल्या वक्तव्यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही आशय काढला की, राहुल गांधी यांचा मनुस्मृतीवर विश्वास नाही. मनुस्मृतीला बदनाम करण्यासाठी ते संसदेत उभे राहून मनुस्मृतीविरोधात खोटे वक्तव्य करतात.

यामुळे हे निश्चित झालंय की, राहुल गांधी हिंदू धर्माविरोधात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्यात येत आहे. जनतेसमोर स्पष्ट केलं जातंय की, राहुल गांधी यांना आजपासून हिंदू मानू नये. कोणत्याही हिंदू पुरोहिताने त्यांची पुजा करू नये. हिंदू मंदिरांमध्ये त्यांच्या प्रवेशाला वर्जित करावं, सर्व सनातनी कार्यांपासून त्यांना वंचित ठेवावं. जी लोक धर्माला मानतच नाहीत, त्यांच्यामुळे धर्माला हानी पोहोचू शकते. तर सर्वच धर्मांमध्ये बहिष्काराचा नियम आहे. याच अधिकाराचा वापर करून धर्म सुरक्षित राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलंय.

स्वप्नात कोण-कोणाला अडवतंय? अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या इच्छेवर…जितेंद्र आव्हाडांचा टोला

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलं की, राहुल गांधीहिंदू धर्माच्या धर्मग्रंथांवर विश्वास ठेवत नाही. मनुस्मृतीत बलात्कार करणाऱ्याला शिक्षा होऊ शकत नाही असे लिहिलेले नाही, राहुल गांधी मनुस्मृतीची बदनामी करत आहेत. तीन महिन्यांपूर्वी या संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते, परंतु आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यांनी माफी मागितली नाही किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. म्हणून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची जाहीर घोषणा केली.

 

Exit mobile version