Download App

Rameshwaram Cafe Blast चा आरोपी मुजम्मिल शरीफ एनआयएकडून ताब्यात; तीन राज्यांत 18 ठिकाणी छापे

Rameshwaram Cafe Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने बंगळुरूमध्ये झालेल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट ( Rameshwaram Cafe Blast ) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये आरोपी मुजम्मिल शरीफ याला एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली. अद्याप देखील या प्रकरणातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Cannes Film Festival मध्ये तीन मराठी चित्रपटांची निवड; ‘जिप्सी’,’भेरा’ अन् ‘वल्ली’ ची वर्णी

बुधवारी एनआयएकडून ही कारवाई करण्यात करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी याबद्दल माहिती देताना एनआयएकडून सांगण्यात आले की, यामध्ये कर्नाटकामध्ये 12 तामिळनाडूमध्ये पाच आणि उत्तर प्रदेशमधील एकाच्या तब्बल 18 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये या स्फोटतील आरोपी मुजम्मिल शरीफ याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू; जेलमध्येच आला ह्रदयविकाराचा झटका

आरोपी मुजम्मिल शरीफ याने एक मार्चला देगलूर येथील आयटीपीएल रोडवरील ब्रुकफील्ड या ठिकाणी असलेल्या कॅफेमध्ये आयडी संबंधित असलेल्या दोन आरोपींना लॉजिस्टिकची सेवा दिली होती. या स्फोटामध्ये रामेश्वरम कॅफेमधील अनेक ग्राहक आणि हॉटेल स्टाफ जखमी झाला होता. तर काही जण गंभीर जखमी झाले होते. तसेच यामध्ये संपत्तीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

follow us