Download App

तुमच्या खिशात असणाऱ्या दोन हजारांच्या नोटांबाबत RBI देणार ‘गुड न्यूज’

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : नोटबंदीच्या मोठ्या धाडसी निर्णयानंतर आरबीआयने (RBI) दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडे असणाऱ्या दोन हजारांच्या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंती मुदत दिली होती. मात्र, देशात अनेक नागरिक असे आहेत ज्यांना काही कारणास्तव अद्यपर्यंत त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बदलणे शक्य झालेले नाही. अशा नागरिकांसाठी आरबीआय लवकर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दोन हजारांच्या नोटा परत करण्याची डेडलाईन वाढवून 31 ऑक्टोबरपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मनी कंट्रोलने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. (RBI May Be Extend Date To Return Rs. 2000 Notes )

धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’

दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर अनेकांनी त्यांच्याकडील नोटा बदलून घेतल्या आहे. नोटा बदलण्याची डेडलाईन संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला आहे. मात्र, असे असतानादेखील अद्यापपर्यंत 24,000 कोटी रकेमेच्या 2000 रुपयांच्या नोटा परत आलेल्या नाहीत. त्यामुळे आता आरबीआय 2000 हजारांच्या नोटा परत करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याबाबत विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

मुदत वाढवण्यामागे अनेक कारणे असून, अनेक भारतीय परदेशात वास्तव्यास आहेत हे मुख्य कारण असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अनेक परदेशी भारतीयांकडे दोन हजारांच्या नोटा असू शकतात. त्यामुळे नोटा बदलासाठी मुदतवाढ दिल्यास परदेशातील भारतीय नागरिकांना अधिकचा वेळ मिळू शकतो.

दगडूशेठ मंडळाने जिंकली लाखो भाविकांची मने; मात्र, अन्य मंडळांमुळे पुण्यातील विसर्जन मिरणूक रेंगाळली

आतापर्यंत किती नोटा जमा झाल्या?

चलनातून दोन हजारांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर देशातील करोडो नागरिकांनी त्यांच्याकडील नोटा बँकांमध्ये जमा केल्या आहेत. दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या आरबीआय़च्या निर्णयानंतर 31 मार्च 2023 पर्यंत दोन हजारांच्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या 19 मे पर्यंत 3.56 लाख कोटींवर आल्या असल्याचे सेंट्रल बँकेने म्हटले आहे.

1 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2000 हजारांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकूण 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही सुमारे 24 हजार कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा नागरिकांकडे शिल्लक आहेत. आरबीआय़ला 100 टक्के दोन हजारांच्या नोटा परत घ्यायच्या आहेत. त्यामुळे उर्वरित 7 टक्के नोटा परत येण्यासाठी आरबीआय़कडून मुदत वाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

Tags

follow us