2000 Rupees Notes : आरबीआयने (भारतीय रिझर्व बँक) 19 मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलणातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या जात आहेत. बँकांमध्ये 23 मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत बँकांमध्ये किती नोटा जमा करण्यात आल्या याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.(rbi says 88 percent of rs 2000 notes returned to banks)
संभाजी भिडेच्या तोंडाला काळं फासा अन् 1 लाख जिंका, काँग्रेसची घोषणा…
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या एकूण 88 टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार 19 मे 2023 पर्यंत 3.56 लाख कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या.
Withdrawal of ₹2000 Denomination Banknotes – Statushttps://t.co/J3MOYyCGIU
— ReserveBankOfIndia (@RBI) August 1, 2023
त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै 2023 पर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. त्यामुळे आता फक्त 42 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनामध्ये उरल्या आहेत. 30 सप्टेंबर 2023 ही दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची शेवटची तारीख आहे.
अजितदादांना शरद पवारांसमोर येण्याची हिंमत होईना; मागून आले अन् निघूनही गेले
आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांबद्दलचं स्टेटस जारी केलं आहे. आरबीआयने म्हटले आहे की, बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2023 पर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून परत आल्या आहेत.
आरबीआयने सांगितले की, आता फक्त 42 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनात उरल्या आहेत. 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर 88 टक्के नोटा पुन्हा बँकांमध्ये परत आल्या आहेत.