Sudha Murthy : प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा आणि नवीन NCERT अभ्याक्रम तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्ये सुधा मुर्ती यांच्यासह गायक शंकर महादेवन, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विबेक देबरॉय, सल्लागार समितीचे सदस्य संजीव संन्याल, आरएसएस विचारवंत चामू कृष्ण शास्त्री यांचा समावेश आहे.
NCERT ने मुलांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 19 सदस्यांची राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन सामग्री समिती (NCTC) स्थापन केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेचे कुलपती महेशचंद्र पंत यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
मोठी कारवाई : पुण्यात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक
ही समिती देशातील शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक विकसकांसाठी रोडमॅप तयार करेल. विशेष म्हणजे 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके आणण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारने आता ही जबाबदारी या समितीकडे सोपवली आहे. ही समिती इयत्ता 3 ते 12 वी साठी शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि अध्यापन साहित्य विकसित करेल.
2024 ला मोदी विरुद्ध प्रियांका? ‘या’ मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार
सध्या प्रचलित असलेली NCERT पाठ्यपुस्तके 2005 NCF च्या आधारे तयार केली गेली आहेत. 2005 NCF नुसार शालेय अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारने स्थापन केलेल्या पाठ्यपुस्तक विकास समितीच्या सदस्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांचा समावेश होता. जूनमध्ये, यादव आणि पळशीकर यांनी NCERT ला पत्र लिहून त्यांची नावे समितीमधून काढून टाकण्याची विनंती केली होती.