Download App

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देशभरातील व्यावसायिकांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे देशभारातील करोडो व्यावसायिकांना याचा फायदा होणार असून, यामुळे फिजिकल दुकानदार असणाऱ्या रिटेल व्यावसायिकांना व्यावसाय करणे अधिक सोयीचे होणार आहे.

केंद्र सरकार लवकरच रिटेल ट्रेड पॉलिसी आणण्याच्या विचारात असल्याचे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) चे जॉइंट सेक्रेटरी संजीव यांनी सांगितले. या पॉलिसीमुळे व्यापाऱ्यांना चांगलं इंन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे. याशिवाय अधिकचे क्रेडिट कर्ज मिळण्यासही मदत होणार असल्याचे संजीव म्हणाले.

Adani Share Price : अदानीमध्ये गुंतवणूक करत तीन दिवसांत कमावले ₹4245 कोटी, कोण आहेत राजीव जैन?

ऑनलाईन रिटेलर्ससाठी आणली जाणार पॉलिसी

फिजिकल दुकानदारांसाठी केंद्र सरकार रिटेल ट्रेड पॉलिसी आणण्च्याच्या विचारात आहे. याशिवाय केंद्र सरकार ऑनलाईन रिटेसर्साठीदेखील ई-कॉमर्स पॉलिसीवर काम करत आहे. रिटेल ट्रेडर्ससोबतच ई-कॉमर्ससाठीदेखील अशा स्वरुपात पॉलिसी आणण्याच्या केंद्राचा विचार आहे.

याशिवाय सर्व रिटेल ट्रेडर्ससाठी असा एक विमा आणाला जाणार असून, याविम्याअंतर्गत व्यावसायिकांचे जीवन अधिक सुरक्षित बनवण्यास मदत होईल. अशा स्वरूपाच्या विम्याशिवाय एक अपघाती विमा योजनेवरदेखील सध्या काम सुरू असून, यामुळे छोट्या व्यावसायिकांना फायदा मिळू शकतो. देशभरात हाय क्वालिटी प्रोडक्ट्स बनवण्यावर अधिक भर असला पाहिजे असेही संजीव म्हणाले.

Tags

follow us