Ram Mandir : राम मंदिर देणगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मोठा खुलासा, आरोपपत्र दाखल

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात उत्तर प्रदेश सरकराने मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ram Mandir

Ram Mandir

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात उत्तर प्रदेश सरकराने मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजताना काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पैशांची चोरी केली असल्याची कबुली उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयात दिली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (SGI) तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.

ज्या व्यक्तींवर दानपेटीतील रक्कम काढण्याची आणि ती मोजण्याची जबाबदारी होती, त्यांनी मोजणीच्या प्रक्रियेदरम्यानच रोख रक्कम चोरली. ही चोरलेली रक्कम एकतर त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली गेली किंवा इतरत्र गुंतवली गेली असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

आरोपपत्र दाखल; कनिष्ठ न्यायालयाला पुढील कार्यवाहीचे निर्देश

सुनावणीदरम्यान उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने सांगितलं की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र देखील दाखल करण्यात आहे. या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कनिष्ठ न्यायालयाला कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच या प्रकरणाची कनिष्ठ न्यायालयाने स्वतंत्रपणे सुनावणी करावी असं देखील सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) स्पष्ट करण्यात आले आहे.

8 आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

या प्रकरणता माहिती देताना न्यायालयात उत्तर प्रदेश सरकारने (Government of Uttar Pradesh) सांगितलं की, तपासादरम्यानसीसीटीव्ही फुटेजमध्ये दानपेटीतील रक्कम मोजताना चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. राज्य सरकारने एसआयटी (SIT) स्थापन करत दानपेटीतील रक्कम मोजणी आणि देखरेखीच्या कामात गुंतलेल्या आठ जणांना अटक केली.

भारतीय स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार 1942’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित

या आरोपींमध्ये टिंकू यादव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, सुभाष श्रीवास्तव, करुणेश पांडे आणि रामशंकर मिश्रा यांचा समावेश आहे. एसआयटीने आरोपींकडून मोठी रोख रक्कमही जप्त केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर, तपास यंत्रणेने सर्व ८ आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Exit mobile version