Rohan Jaitley replies Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने (Rahul Gandhi) केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत आहेत. निवडणूक आयोग मतांची चोरी करता असा आरोप (Election Commission) करत त्यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांना आयोगाने मुद्देसूद उत्तर दिले होते. यानंतर आता त्यांनी पुन्हा भाजपला लक्ष्य केलं आहे. आम्ही ज्यावेळी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत होतो तेव्हा मला धमकावण्यासाठी भाजपने अरुण जेटलींना पाठवलं होतं. त्यांनीही माझ्याविरुद्ध कारवाईचा इशारा दिला होता, असा दावा राहुल गांधींनी केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर दिवंगत अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी माझ्या दिवंगत वडिलांबाबत खोटे दावे केले आहेत असे रोहन जेटली म्हणाले.
राहुल गांधी यांनी केलेला दावा पूर्ण खोटा असल्याचे रोहन जेटली यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करत राहुल गांधींना चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की राहुल गांधी माझ्या वडिलांबाबत जे बोलत आहेत ते खोटं आहे.
Rahul Gandhi: हे मोदी अन् भाजप सरकार नसून अदानी अन् अंबानी सरकार; राहुल गांधींचा घणाघात
राहुल गांधी असा दावा करत आहेत ते कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना माझ्या वडिलांनी त्यांना धमकावलं होतं. पण आता मला त्यांना काही गोष्टींची माहिती करुन द्यायची आहे. मुळात माझ्या वडिलांचं निधन 2019 मध्येच झालं होतं. तर कृषी कायदे 2020 मध्ये सादर करण्यात आले होते. मग माझ्या वडिलांनी त्यांना या कायद्यांवरुन कसं धमकावलं? आणखी महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही विरोधकाला धमकावण्याचा स्वभाव माझ्या वडिलांचा नव्हता. ते लोकशाही मानणारे आणि जपणारे व्यक्ती होत, असे रोहन जेटली यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जरी एखाद्या वेळी अवघड स्थिती निर्माण झाली तरी सर्वाना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी माझ्या वडिलांनी मुक्त आणि खुल्या चर्चेचं आवाहन केलं असतं. ते असेच होते म्हणूनच तर आजही माझे वडिल लोकांच्या स्मरणात आहेत असेही रोहन जेटली यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. जे लोक आज हयात नाहीत त्यांच्यावरुन राहुल गांधी राजकारण करत आहेत अशी टीका रोहन जेटली यांनी केली.
तुम्ही कुठही जा तुम्हाला सोडणार नाही; निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांचा पुन्हा घणाघात