भोपाळः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानबाबत एक मोठे विधान केले आहे. पाकिस्तान स्वतंत्र्य होऊन ७० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण पाकिस्तानातील लोक अजूनही सुखी नाहीत. भारताची फाळणी ही चूक होती, असे पाकिस्तानचे लोक म्हणतात, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे.
Indian Railways : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून खुशखबर…संसदेत केल्या ‘या’ घोषणा!
भोपाळ येथील शहीद हेमू कलानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दोन्ही देशांमधील संबंधाबाबत भागवत म्हणाले की भारतामध्ये इतरांवर हल्ले करण्याची संस्कृती नाही. आम्ही त्या संस्कृतीचे आहोत, जी स्वसंरक्षणात चोख प्रत्युत्तर देते. भारताची फाळणी ही चूक होती असे पाकिस्तानचे लोक आता म्हणतात. सर्वजण म्हणतात की फाळणी ही चूक होती. यावेळी भागवत यांनी सिंधी समाजाचे कौतुक केले आहे.
जनतेचा पैसा अदानींच्या खिशात घातला, नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
आम्ही ती भूमी भौतिकरित्या सोडली. पण ती 1947 पूर्वी काय होती, असे कोणी विचारले तर तो भारत होता, असेच म्हणावे लागेल. सिंधूपासूनच त्याला हिंदू म्हटले जाते. अखंड भारत म्हटले तर सिंधू संस्कृती विसरता येणार नाही, असे भागवत म्हणाले.