जेव्हा अंगावर पंचाहत्तरीची शाल पडते, त्याचा अर्थ आता थांबावं; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे?

Mohan Bhagvat यांनी निवृ्त्तीबाबत विधान केलं आहे. मात्र या विधानातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Mohan Bhagvat

Mohan Bhagvat

RSS Sarsanghchalak Mohan Bhagvat on Retirement is it for PM Narendra Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat) यांनी निवृ्त्तीबाबत एक मोठं विधान केलं आहे. मात्र या विधानातून त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. जेव्हा अंगावर पंचाहत्तरीची शाल पडते त्याचा अर्थ आता थांबावं. असं वक्तव्य भागवत यांनी केलं. ते संघाचे दिर्घकाळ प्रचारक राहिलेल्या मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरील मोरोपंत पिंगळे : द हिंदू अर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

संघाचे दिर्घकाळ प्रचारक राहिलेल्या मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत (Mohan Bhagvat) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भागवत यांनी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं. या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हे विधान त्यांच्या स्वत:च्या निवृत्तीबाबत आहे की, यातून भागवत यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. अशा चर्चांना उधाण आले आहे.

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

यावेळी बोलताना भागवत (Mohan Bhagvat) म्हणाले की, मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की, जेव्हा अंगावर पंचाहत्तरीचा शाल पडते. त्याचा अर्थ आता थांबावं. तुमचं वय झालं आहे. तुम्ही बाजूला व्हा. आम्हाला संधी द्या. त्याचबरोबर भागवत यांनी पिंगळे यांचा आणखी एक किस्सा सांगितला. जेव्हा पिंगळे यांना रामजन्मभूमीच्या आंदोलना बाबत विचारंल तेव्हा त्यांना याबाबत अशोक सिंघल यांना विचारावं असं सांगितलं. त्यांना आंदोलन करायचं ठरवलं आणि आम्ही त्यात सहभागी झालो. असं उत्तर पिंगळे यांनी दिलं होतं त्यामुळे त्यांचा श्रेय लाटणे हा स्वभाव नव्हता. असं सांगत भागवतांनी श्रेयवादाच्या राजकारणाला देखील टोला लागावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा 22 देशांना दणका, टॅरिफची पत्रे धाडली; 50 टक्के टॅक्स अन्..

दरम्यान बुधवारी 9 जुलै रोजी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील निवृत्तीचे संकेत देणारं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर माझे आयुष्य वेद, उपनिषदांच्या अभ्यासासाठी समर्पित करेन. तसेच निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करेल. नैसर्गिक शेती हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे, नैसर्गिक शेती अनेक अर्थांनी फायदेशीर आहे, असं शाह म्हणाले.

Exit mobile version