Download App

Sandeshkhali Violence : संदेशखाली हिंसाचार प्रकरण; TMCचे नेते शेख शहाजहाँ यांना अटक

Sandeshkhali Violence : बहुचर्चित संदेशखाली हिंसाचार प्रकरणात (Sandeshkhali Violence) पश्चिम बंगालकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहाँ शेख (Shaikh Shahajaha) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शहाजहाँ शेख यांना पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

संदेशखाली प्रकरणी मागील अनेक दिवसांपासून शहाजहाँ शेख फरार होते. जवळपास 55 दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर 55 दिवसांनंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शेख यांना बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी; जरांगेंच्या चौकशीवरुन पटोलेंनी घेरलं

शेख यांच्यासह समर्थकांवर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शेख यांनी आणि समर्थकांनी जमीन बळकावण्यासह लैंगिक अत्याचारही केले असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शेख यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी अनेकांना धमकी दिल्याचाही प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीएमसीच्या नेत्यांवर संदेशखाली प्रकरणी गंभीर आरोप केले होते. इराणी म्हणाल्या, संदेशखालीमध्ये टीएमसीचे गुंडे प्रत्येक रात्री महिलांचे अपहरण करीत होते. हे गुंड महिलांवर बलात्कार करीत होते. संदेशखाली येथील महिलांनी आपल्यावर घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांना सांगितलं.

महिलांच्या दाव्यानूसार टीएमसीचे गुंड सुंदर दिसणाऱ्या महिलांच्या घरी चाचपणी करण्यासाठी येत असत. त्यानंतर त्या महिलेच्या पतीला सांगत की आता आमचा तुझ्या पत्नीवर अधिकार आहे. त्यानंतर त्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करीत असत. राज्यातील दलित, मच्छिमार, आणि शेतकरी समाजातील महिलांनी हे आरोप केले असल्याचंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं होतं.

follow us

संबंधित बातम्या