Download App

School Admission : देशात सहा वर्षांच्या बालकांनाच शाळेत प्रवेश मिळणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं (Central Government) शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी (School Admission) बालकांचं वय निश्चित केलंय. नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. शिक्षण मंत्रालयानं (Education Ministry)सर्व राज्य (States)आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केलाय.

त्यानुसार आता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचं वय सहा वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे. सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. केंद्र सरकारकडून शैक्षणिक नियमांमध्ये हा मोठा बदल करण्यात आलाय. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे.

HSC Exam : बोर्ड परीक्षेत इंग्रजीनंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चूक

देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय वेगवेगळे होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकसभेत एका प्रश्नावर दिलेल्या माहितीनुसार, यामधील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलांच्या पहिली इयत्तेतील प्रवेशासाठी सहा वर्षे वय असण्याचा नियम लागू नव्हता. येथे मुलांना वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पहिली इयत्तेत प्रवेश घेण्याची परवानगी होती.

गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे 5 वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आता सरकारनं नवीन नियम लागू केला आहे.

Tags

follow us