Security breach at ParliamentMan tries to scale wall, jump into premises : संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले असून, एका व्यक्तीने भिंतीवरून उडी मारून संसद भवनाच्या आवारात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अशाप्रकाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Man scales wall of Parliament, caught by security personnel: Delhi Police official. pic.twitter.com/e3fShuMJUQ
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2025
सुरक्षा भेदून संसदेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी संसदेच्या गरुड गेटवर पोहोचला होता, तिथून सुरक्षा दलांनी त्याला पकडल्याचे सांगितले जात असून, संसद भवन परिसरात ही व्यक्ती कोणत्या उद्देशाने घुसली होती हे चौकशीअंती समोर येईल. ही घटना सकाळी ६:३० वाजता घडल्याचे सांगितले जात असून, रेल भवनच्या बाजूने असलेल्या भिंतीवरून संबंधित आरोपीने उडी मारून संसद भवनात प्रवेश केला. त्यानंतर संबंधित व्यक्ती गरुड द्वार येथे पोहोचली मात्र, सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अटक केली.
मोठी बातमी! भटक्या कुत्र्यांना नसबंदी करून सोडून द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचा सर्व राज्यांना आदेश
संसदेत घुसलेला तरुण मनोरुग्ण?
सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं, तरुण मनोरुग्ण असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तरुण ज्या ठिकाणाहून रेल भवनजवळून संसदेत शिरला, तिथे नेहमी पीसीआर सुरक्षा असते. रेल भवनजवळील पीसीआर कर्मचाऱ्याने एक तरुण भिंतीवर चढत असल्याचं पाहिलं आणि त्याला त्वरीत ताब्यात घेतलं.
सुरक्षेत चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही
संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 13 डिसेंबर 2024 रोजी काही लोकांनी संसद भवनात प्रवेश करत पिवळ्या गॅसच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच जोरदोरात घोषणाबाजीही केली होती. या घटनेवेळी लोकसभेत काही महत्त्वाचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.