Cricketer Anaya Bangar : माजी क्रिकेटपट्टू संजय बांगर (Sanjay Bangar) यांचा मुलगा आर्यन बांगरची लिंगबदलाच्या मुद्द्यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. आर्यन बांगर आता अनाया बांगर (Anaya Bangar) झाली आहे. मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, यासोबतच एका माजी क्रिकेटपट्टूने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्ती केली असल्याचा दावा अनाया बांगरने केलायं. लल्लनटॉप या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनायाने दावा केलायं.
“विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांची नावं माहित त्यांना आता..” सुजय विखेंच्या रडारवर नेमकं कोण ?
पुढे बोलताना अनाया बांगर म्हणाली, जेव्हा मी 8 वर्षांची होते तेव्हा आईच्या कपाटातून कपडे चोरुन वेशभूषा करीत होते. त्यानंतर आरशात पाहून मी एक मुलगी आहे आणि मला मुलगी बनायची इच्छा व्यक्त करत होती. मी मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जयस्वालांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंसोबत क्रिकेट खेळलेली आहे. मला याबाबत गोपनियता ठेवावी लागली कारण माझे वडील एक क्रिकेटपट्टू होते, असं अनाया बांगरने स्पष्ट केलंय.
Google, Meta सह दिग्गज कंपन्याची कर्मचाऱ्यांवर वक्रदृष्टी; तीनच महिन्यांत हजारो बेरोजगार..
तसेच मी मुलगी बनल्यानंतर मला काही क्रिकेटपट्टूंनी न्यूड अवस्थेतील फोटो पाठवले होते. मी माझ्या सद्यस्थितीबद्दल एका माजी क्रिकेटपट्टूला सांगितलं, त्यावर त्याने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, माझ्यासोबत कारमध्ये चल, असंही म्हंटला असल्याचं अनायाने सांगितलंय. क्रिकेटपट्टू संजय बांगर यांच्यासारखीच अनाया बांगरसुद्धा एक क्रिकेटपट्टू असून तिने स्थानिक क्रिकेट क्लबमध्ये प्रतिनिधीत्वही केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नोव्हेंबर 2023 साली ट्रान्सजेंडर महिलांना क्रिकेटमध्ये परवानगी दिली नाही.
विधानसभा निवडणूक प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयाने बजावली CM फडणवीसांना नोटीस
तसेच काही क्रिकेटपट्टू तर माझ्यासमोर अश्लिल शिव्या देत असत. तसेच माझे फोटोही मागत असतं. एका गोष्टीचं दुख: आहे की महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सला खेळण्याची परवानगी मिळायला हवी. माझे टेस्टोस्टोरॉन इतर महिलांसारखेच आहे. देशाच्या संघात खेळण्याची माझी इच्छा असल्याचं अनायाने सांगितलंय.
लिंगबदलानंतर कोणते बदल होतात?
हार्मोन्स आणि लिंगबदलानंतर शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचा दावा अनाया बांगरने केला आहे. लिंगबदलानंतर महिलांसारखाच फेस होतो. हार्मोन्सच्या बदलामुळे शरीरात वेगळ्या भावना तयार होतात. तसेच पुरुषांसारखी दाढी येणं पूर्णपणे बंद होत नसून त्यासाठी लेझर हेड वापरावे लागतं त्यासाठीही मला सेशन करावे लागलं. शरीराच्या प्रत्येक गोष्टींवर बदल होत असतात, असा दावा अनायाने केलायं.