Veteran actress Shabana Azmi : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लेखक जावेद अख्तर ही बॉलिवुडमधली प्रसिद्ध जोडी आहे. त्यांच्याबद्दल अनेकांगाने चर्चा होत असते. असाच एक विष पुन्हा समोर आला आहे. (Azmi ) जावेद आणि हनी यांचा घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांमध्येच शबानी आझमींनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर शबाना आझमी यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यावर शबाना आझमी बोलल्या आहेत.
फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा
शबाना आझमी यांनी 1984मध्ये लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं. शबानापूर्वी जावेद यांचं लग्न हनी इराणीशी झालं होतं. त्यांच्यापासून त्यांना झोया अख्तर आणि फरहान अख्तर ही दोन मुलं आहेत. दरम्यान, फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, मी एक स्त्रीवादी मॉडेल होते आणि मी असे काही केले जे समजण्यापलीकडे होतं. कारण मला असं वाटत होतं की मी जे काही करत आहे ते माझ्या स्वतःच्या आनंदासाठी. आणि त्यासाठी मी दुसऱ्या महिलेचे हक्क हिरावून घेत आहे.
मग गप्प राहणे योग्य होते
शबाना आझमी पुढे म्हणाल्या, जे मला स्त्रीवादी मानत होते त्यांना असं वाटण्याचा पूर्ण अधिकार होता. पण नंतर, मला वाटलं की मी ज्या परिस्थितीमध्ये लग्न केलं याबद्दल सांगायला गेलं तर ते संबंधित लोकांना आणि कुटुंबांना आणखी त्रासदायक ठरेल. त्यावेळी गप्प राहणंच गरजेचं होते आणि मला वाटते की तो खूप शहाणपणाचा निर्णय होता. कारण माझ्यावर झालेल्या चिखलफेकीनंतर ते शांत झालं.
पहिल्या पत्नीशी नातं कसं?
शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणीसोबतच्या नात्याबद्दलही खुलासा केला. शबाना यांनी सांगितलं की हनी आणि त्यांचं नातं चांगलं आहे. त्या म्हणाल्या, हे शक्य झालं कारण त्यावर चिखलफेक झाली नाही. याचे श्रेय हनी, मी आणि जावेद यांना जातं. तुम्हाला जे चूक वाटतं हे स्पष्ट करण्यासाठी तुमच्याकडं काही आधार असला पाहिजे. पण आम्ही तिघांनीही ते टाळलं आणि तो खूप शहाणपणाचा निर्णय होता असंही त्या म्हणाल्या आहेत.