अभिनेत्री झाली पायलट; सई ताम्हणकरच्या कृत्याच या बॉलिवुड अभिनेत्याने केलं खास कौतुक
Actress Sai Tamhankar paragliding : काही दिवसांपूर्वी व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असल्याचं तिच्या प्रेक्षकांना सांगितलं. आता अभिनयाच्या सोबतीने सई करीयरची वेगळी वाट म्हणून पॅराग्लायडिंग पायलट बनली आहे. प्रेक्षकांनी तिच्या नव्या प्रवासाला तर शुभेच्छा (Sai Tamhankar) दिल्या पण अगदी बॉलिवूडमधीस काही बड्या स्टार्सनी तिच्या या खास कृत्याचं कौतुक केलं आहे.
सईने सोशल मीडिया वर तिच्या पॅराग्लायडिंगचा एक खास व्हिडिओ शेयर केला असून, हे तिचं पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाईंग होत. सईची जिद्द कमालीची आहे आणि तिच्या मित्र मंडळीने देखील आता तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देऊन तिचं खास कौतुक केलं आहे.
नव्या वर्षाची नव्या करीयर सोबत सईने सुरुवात केली आणि पायलट म्हणून तिचा हा प्रवास तिला समृध्द संपन्न अनुभव देऊन जाणारा आहे असं देखील सईने म्हटलं होत. आकाशावर मनापासून प्रेम करणारी सई आता चक्क आकाशाला गवसणी घालताना दिसतेय.
यावेळी लेटेस्ट पोस्टमध्ये तिने अवकाशात झेप घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि सई म्हणते प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं. सईने हा प्रवास खूपच रोमांचक, शुद्ध आणि पूर्णत्व देणारा असल्याचे देखील म्हटलं आहे.
सईच्या या व्हिडिओवर बॉलिवुड अभिनेता आर माधवन गायक विशाल दादलानी, शाल्मली खोलगडे यांच्या सोबतीने तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करत तिचे कौतुक केलं आहे.