Video : घाटात खच्चून ट्रॅफिक जाम; पाचगणीचा पठ्ठ्या थेट ‘पॅराग्लायडिंग’ करत परीक्षा केंद्रावर पोहोचला

  • Written By: Published:
Video : घाटात खच्चून ट्रॅफिक जाम; पाचगणीचा पठ्ठ्या थेट ‘पॅराग्लायडिंग’ करत परीक्षा केंद्रावर पोहोचला

महाबळेश्वर : मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये दररोज वाहतुकीची कोंडी होणे सवयीचे झाले असून, लांबच लांब रांगा लागलेल्या रस्त्यावरून करोडो नागरिक त्यांच्या इच्छित स्थळी पोहचत असतात. मात्र, पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणीतील टॅफीक जॅमध्ये अडकलेल्या एका पठ्ठ्यानं परिक्षेला उशीर होऊ नये म्हणून चक्क पॅराग्लायडिंग (Paragliding ) करत परीक्षा केंद्र गाठल्याचा हटके प्रकार समोर आला आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली असून, त्याचा व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Pachgani Student Paragliding Video )

म्युच्युअल फंड स्विच करताय? मग आधी फायदे अन् तोट्याचं गणित समजून घ्या..

पाचगणीत नेमकं काय घडलं?

सध्या राज्यभरात परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे घरोघरी अभ्यासाचं वातावरण असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तर, उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्याने काही नागरिकांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणी आणि महाबळेश्वरकडे धाव घेतली आहे. मात्र, वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी असलेल्या घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचाच फटका येथील स्थानिक विद्यार्थ्याला बसला आणि या पठ्ठ्यानं वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला उशीर होऊ नये यासाठी थेट पॅराग्लायडिंग करत इच्छितस्थळी पोहण्याचा पर्याय निवडला.

व्हॅलेंटाईन डे निमित्त बेंगळुरूमध्ये झळकलं अजब पोस्टर; फक्त ३८९ द्या अन् मिळवा भाड्याने बॉयफ्रेंड

घडलेल्या घटनेविषयी माहिती देताना पॅराग्लायडिंग चालवणारे व्यावसायिकाने सांगितले की, आमचा GP अॅडव्हेंचरचा फ्लाईंग पॉईंट आहे तेथे आम्ही सर्वजण उभे होतो. त्यामुळे तेथील मुलांमध्ये कुजबूज चालू होती की, एका विद्यार्थ्यांला घाटातील वाहतूक कोंडींमुळे परिक्षेला जाण्यास उशीर झाला आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर मी विचारपूस केली की, नेमकं काय घडले आहे. त्यावेळी संबंधित विद्यार्थ्याला परिक्षा केंद्रावर पोहण्यासाठी अवघा 15 ते 20 मिनिटांचा वेळ शिल्लक असल्याचे कळाले.

त्यावेळी संबंधित विद्यार्थ्याला पॅराग्लायडिंगने खालपर्यत सोडण्याचे ठरले त्यानंतर विद्यार्थ्याला पायलटने बसवत खाली ग्राऊंडवर सोडले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्या अवघ्या पाच मिनिटात परिक्षा केंद्रावर पोहचला आणि त्याला पेपर देता आल्याचे पॅराग्लायडिंगचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकाने सांगितले. परीक्षा देणारा हा विद्यार्थी बी.कॉम प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube