वाहतूक कोंडीत पुणे देशात तिसरे, कोलकाता जगात दुसरे; ‘ट्राफिक’चा धक्कादायक अहवाल
कोलकाता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात हळूवार शहर मानले गेले आहे. तर बंगळुरू आणि पुणे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

Traffic Jam : वेगाने विकसित होणाऱ्या भारतात वाहतूक कोंडी एक (Traffic Jam) मोठी समस्या बनली आहे. मोठ्या शहरांत तर ट्रॅफिक जॅममुळे नागरिक अगदी हैराण झाले आहेत. ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. कोलकाता आणि बंगळुरू या दोन शहरांत तर प्रचंड ट्रॅफिक आहे. या दोन शहरांनी जगातील चार सर्वाधिक वाहतूक असलेल्या शहरांत स्थान मिळवले आहे. कोलकाता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात हळूवार चालणारे शहर मानले गेले आहे. तर बंगळुरू आणि पुणे शहर जगात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2024 नुसार कोलकात्याने बंगळुरूला मागे टाकत सर्वाधिक ट्रॅफिक असणाऱ्या शहरांच्या यादीत पुढील क्रमांक मिळवला आहे. कोलकात्यात दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. या बाबतीत कोलकाता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बरेंक्वीला शहर आहे.
बंगळुरू पुण्यात ट्रॅफिक समस्या गंभीर
भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बंगळुरू शहरात दहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. टेक इंडस्ट्रीचा वेगाने विकास होत असल्याने येथे देश विदेशातून लोक येत असतात. यामुळे शहरातील दळणवळणाची साधने आणि मूलभूत सुविधांवरील ताण प्रचंड वाढला आहे. याच पद्धतीने पुणे देखील एक वेगाने विकसित होणारे टेक हब आहे. या शहराला सुद्धा आता वाहतूक कोंडीचा ताण सहन करावा लागत आहे. येथे सुद्धा दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो.
गड्या , आपला BMI कंट्रोल केलेलाच बरा; जास्त वाढला तर ‘या’ आजारांचा धोका
उर्वरित पाच शहरांत लंडन एकमेव बिगर भारतीय शहर आहे. येथे दहा किलोमिटर अंतर पार करण्यासाठी सरासरी 33 मिनिटे आणि 17 सेकंदाचा वेळ लागतो. वाहतूक कोंडी ही जागतिक समस्या बनली आहे. यावर मात करण्याचे प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही.
डच लोकेशन टेक्नॉलॉजी फर्म टॉमटॉम प्रत्येक वर्षी जगातील शहरांतील वाहतुकीचा आढावा घेत असते. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2024 साठी 600 मिलियन पेक्षा जास्त कनेक्टेड डिव्हाईसच्या माध्यमातून डेटा गोळा करण्यात आला होता. यमध्ये टॉमटॉम ॲप्लिकेशनचा वापर करणारे इन कार नेवीगेशन सिस्टम आणि स्मार्टफोनचा समावेश होता. जे 62 देशांतील 500 शहरांनी कव्हर करते.
अन्य शहरांचा नंबर कितवा
लंडन, क्योटो, लिमा आणि डब्लिन जगातील सर्वात धीम्या गतीने चालणारी शहरे आहेत. भारतातील शहरांत हैदराबाद आणि चेन्नई देशात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबई सहाव्या तर अहमदाबाद सातव्या क्रमांकावर आहे. देशाचे राजधानी दिल्ली या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर हैदराबाद 18 व्या तर चेन्नई 31 व्या क्रमांकावर आहे. मुंबई 39 व्या तर अहमदाबाद 43 व्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर नवी दिल्ली शहर 122 व्या क्रमांकावर आहे.