मी गावी आलो की इकडचं टेम्परेचर कमी होतं, अन् मुंबईत वाढतं…; उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला

मी गावी आलो की इकडचं टेम्परेचर कमी होतं, अन् मुंबईत वाढतं…; उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद (Eknath Shinde) यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar)  पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी म्हणाले, मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं असे विधान शिंदेंनी केलं.

राजुरमध्ये काविळीचं थैमान! पालकमंत्री विखेंनी प्रशासनाला धरले धारेवर; आजाराचा घेतला आढावा 

महाबळेश्वरला सुरू असलेल्या पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी त्यांच्या दरे दौऱ्यानंतर होणाऱ्या चर्चांवर मिश्किल टिप्पणी केली. राम शिंदेंनी महाबळेश्वरला आलं की टेम्परेचर कमी होत असं म्हटलं होतं. यावर एकनाथ शिंदेंनी मी गावाला आलो की, इकडंचं टेम्परेचर कमी होतं, पण मुंबईत वाढतं, असं म्हटलं.पुढं ते म्हणाले मी गावाला आलो की, लगेच विरोधक याच्या बातम्या करतात, पण मी याचा आनंद घेतो. आता या पर्यटन महोत्सवात येऊन तुम्ही पाहिलं असेल की मी इकडे गावी का येतो, निसर्ग आहे इकडं. मी गावी आलो की, २-३ हजार झाडं लावत असतो. काजूपासून नारळ आणि सुपारीपर्यंतची झाडे लावतो, असं शिंदे म्हणाले.

महाबळेश्वरमध्येही बांबूची लागवडही केलीये. बांबू हा जास्त ऑक्सिजन देणारा कार्बन डायऑक्साइड शोषणारा आहे. मुख्यमंत्र्यांना बरोबर माहितीय बांबू कुठे वापरायचं ते, अशी मिश्किल टिप्पणीही शिंदेंनी केली.

सीमा हैदरवर गुजरातमधील तरुणाचा हल्ला, आधी घरात घुसला, नंतर गळा…, नेमकं काय घडलं? 

पुढं शिंदे म्हणाले की, पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅक वॉटर महाफेस्टीवल घेतला पाहिजे. फक्त देशातूनच नाही तर जगभरातले लोक इकडे येतील. महाबळेश्वर आणि इथल्या संस्कृतीचा सगळं अनुभव घेतली आणि आनंद लुटतील. महाबळेश्वरपासून ते पाटणपर्यंतच्या परिसरात बॅकवॉटरमध्ये बंदी होती. मी मुख्यमंत्री असताना आणि तुम्ही गृहमंत्री असताना ही बंदी उठवण्यात आली. ही बंदी १९६० पासून होती. येथील तरुणांनी नोकरीसाठी मुंबई-ठाण्याला जाऊ नये आणि इथंच रोजी रोटी मिळावी, अशी भूमिका सरकारची आहे. म्हणून जे गेलेते, ते परत आले पाहिजे, यासाठी असे पर्यटन महोत्सव आयोजित करणे महत्त्वाचे आहे, असे शिंदे म्हणाले.

आपण गट शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उत्पादन घेतलं पाहिजे. मी म्हणतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बंर, त्याच्या कुशीत वसलं माझं गावं दरं, असं म्हणत शिंदेंनी त्यांच्या भाषणाचा समारोप केलाय.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube