Abu Azmi : अजित पवारांची मोठी खेळी, अबू आझमी ‘मविआ’ तून बाहेर
Abu Azmi : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमधून समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहायचं नसल्याचे कारण देत समाजवादी पार्टी महाविकास आघाडीमधून (MVA) बाहेर पडत असल्याची माहिती अबू आझमी (Abu Azmi) यांनी दिली.
तर दुसरीकडे अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट घेतल्याने समाजवादी पार्टी लवकरच महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला असल्याची देखील चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने 2 जागा जिंकले आहे. विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यावेळी माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, मी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहे. शिवसेनेबरोबर आम्ही राहणार नाही. बाबरी मशिदीबाबत आमचा अपमान झाला आहे. माझे सर्व आमदार वेगळा गट स्थापन करणार आहे. मी आज शपथ घेतली आहे आणि अजित पवार यांच्याशी देखील भेटी झाली आहे. लवकरच पुढचा निर्णय कळवतो. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी दिली.
तर दुसरीकडे तुम्हाला महायुतीसोबत राहायचं आहे असं थेट सांगा असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी अबू आझमी यांना लावला. अबू आझमी यांना लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी बाबरी मशीदीच्या अपमानाबाबत आठवण झाली नाही का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर अनेकांकडून विचारण्यात येत आहे. अबू आझमी यांनी विधानसभा निवडणुकीत 12 हजार मतांनी एआयएमआयएम (AIMIM) उमेदवाराचा पराभव केला होता.
मोठी बातमी! बिहारमध्ये खान सरांना अटक, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकले आहे तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर विजय मिळवता आला आहे. आज विधानसभेमध्ये 288 आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत शपथविधीस नकार देत सभात्याग केला.