Download App

“विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांची नावं माहित त्यांना आता..” सुजय विखेंच्या रडारवर नेमकं कोण ?

विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही.

Sujay Vikhe : विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत काम करताना चुका माफ होतील, पण गद्दारी करणाऱ्यांना माफ करणार नाही. व्हॉट्सॲप चॅट, कॉल्स, बैठका सर्व माहिती माझ्याकडे आहे. कोणीच सुटणार नाही, असा थेट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी दिला. नेते कितीही दगाफटका करत असले तरी जनतेच्या मनात फक्त विखे पाटीलच आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.०, टर्शरी ट्रीटमेंट प्लँट लोकार्पण सोहळ्यानिमित्त सुजय विखे पाटील बोलत होते. शिर्डी परिसरात पाण्याची दुरवस्था लक्षात घेता पुढील आठवड्यात गोदावरी नदीच्या रुंदीकरणाचे १९० कोटींचे काम देखील सुरू होणार आहे. हे काम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राबवले जाणार आहे. पाटाच्या चाऱ्यांवर कोणतेही अतिक्रमण असो, नगरसेवक असो की नगराध्यक्ष, शेतकऱ्यांचे पाणी अडवले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून सुजय विखे पाटील यांनी चाऱ्यांवरील अनधिकृत अतिक्रमण मुक्तता करण्याचे आश्वासन दिले.

महंमद महाराज मंदिर जिर्णोध्दारप्रकरणी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी; नीलेश लंकेंची मागणी

शिर्डीतील बदल: गुन्हेगारीवर कारवाई

मागील एक महिन्यापासून शिर्डीत होत असलेल्या बदलांचे दर्शन घडत आहे. हे कोणत्याही व्यक्ती विरोधातील द्वेषातून नव्हे तर गुन्हेगारीच्या विरोधातील कारवाई आहे. जिथे गुन्हेगार, दारू भट्ट्या आहेत त्यांचा पत्ता सांगा दुसऱ्या दिवशी तिथे जेसीबी जाईल आणि त्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील असे सुजय विखे म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कोटींच्या थीम पार्कची वर्क ऑर्डर कालच मंजूर झाली असून ते प्रकल्प १०० कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे. याशिवाय शिर्डी शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी होणार आहे.

..तर आम्ही शिर्डीत उपोषण करू 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्हीआयपी दर्शनासंदर्भात देखील भूमिका मांडली असून त्यांनी स्पष्ट केले की सर्व ग्रामस्थांनी व सर्व पक्षांनी मिळून व्हीआयपी दर्शनासंदर्भात ठाम भूमिका मांडावी. तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डी येथे काकड आरतीनंतर दोनच तास व्हीआयपी दर्शन चालू व्हावे. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली जो धंदा चालू आहे त्याला आळा बसवून सर्वसामान्य जनतेला व समस्त साईभक्तांना दर्शन घेण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्वांनी लक्ष घालावे असे आवाहन केले.

संस्थानकडे याबाबत येत्या आठ दिवसांत निवेदन दिले जाणार असून त्यानंतर संस्थानाला याबाबत पूर्तता करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल त्यानंतर निर्णय न झाल्यास उपोषण करू असा इशारा माजी खासदार सुजय विखे यांनी दिला.

माझ्या अकाऊंटवर 10 लाख आले, रणजित कासलेंचा मुंडेंवर खळबळजनक आरोप

follow us