Download App

Share Bazar : प्रॉफिट बुकिंगचा मोठा झटका, गुंतवणुकदारांना 2.80 लाख कोटींचा फटका

Share Bazar : दोन दिवसांच्या उसळीनंतर आज प्रॉफिट बुकिंगमुळे (profit booking)शेअर बाजारात Share Bazar मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक घसरण ही आयटी (IT)आणि एनर्जी क्षेत्रातील (Energy sector)शेअर्समध्ये झाल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर याचा चांगलाच फटका मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्सला (Smallcap Shares)बसला आहे. या प्रॉफिट बुकिंगमुळे गुंतवणुकदारांना तब्बल 2.80 लाख कोटींचा फटका बसला आहे.

अन्यथा शासनाचा बुरखा फाडू; वाळू वाहतूक धोरणावरून तनपुरेंचा थेट इशारा

आज सेन्सेक्स (Sensex)पुन्हा 73 हजारांच्या खाली घसरला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी BSE सेन्सेक्स 434 अंकांच्या घसरणीसह 72,623 अंकांवर तर NSE चा निफ्टी 142 अंकांच्या घसरणीसह 22.055 अंकांवर बंद झाला.

सरकार निवडणुकांची वाट पाहते का? कांदा निर्यातबंदीवरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, एनर्जी, फार्मा, मीडिया, इन्फ्रा कंझ्युमर ड्युरेबल्स, बँकिंग, ऑटो, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. यात अपवाद होते फक्त एफएमसीजी, धातू आणि रिअल इस्टेट.

आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 618 अंकांच्या घसरणीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 167 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 16 घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 16 शेअर्समध्ये वाढ तर 34 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

शेअर बाजारातील घसरणीमुळं मार्केटकॅप चांगलेच घसरले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 388.82 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. ते मागील ट्रेडिंग सत्रात 391.62 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवसायात गुंतवणुकदारांचे 2.80 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

follow us

वेब स्टोरीज