Share Market : आठवड्याच्या सुरूवातीलाच गुंतणुकदार चिंतेत; सेन्सेक्स 600 अंकानी गडगडला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकांची घसरण पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 57, 360.72 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर निफ्टीमध्ये 189.95 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी हा 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 16,910.10 रुपयांवर व्यवहार करत आहे. Deepak Tijori : ‘आशिकी’ फेम दीपक तिजोरीला 2.6 कोटींना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 20T110000.696

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 20T110000.696

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 600 अंकांची घसरण पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 57, 360.72 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर निफ्टीमध्ये 189.95 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी हा 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 16,910.10 रुपयांवर व्यवहार करत आहे.

Deepak Tijori : ‘आशिकी’ फेम दीपक तिजोरीला 2.6 कोटींना गंडवलं, मुंबईत FIR दाखल

आज सकाळी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 216.38 अंक व 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 57773 वर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी हा 33.45 अंक व 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 17066 वर व्यवहार करत होता. आजच्या दिवशी सेन्सेक्सची हालत खराब दिसत आहे. आज सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 2 शेअर्समध्ये तेजी पहायला मिळत आहे, तर 28 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. तसेच निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी केवळ 5 शेअर्स तेजीत दिसत आहेत व 45 शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

Share Market : आठवड्याच्या सुरूवातीलाच गुंतणुकदार चिंतेत; सेन्सेक्स 600 अंकानी गडगडला

आज सेन्सेक्सच्या फक्त दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. हिंदुस्थान यूनीलीवर व टायटन या दोन शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. तर कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एलएंडटी, नेस्ले, एनटीपीसी, भारती एअरटेल, एक्सिस बँक, अल्ट्राटेक सीमेंट, एशियन पेंट्स, आयटीसी, एचडीएफसी, सन फार्मा, मारुती, एचसीएल टेक व पावरग्रिड या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

 

Exit mobile version