Stock Market : गुंतवणूकदारांना फटका; सेन्सेक्स 671 तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह बंद

Share Market :  आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशेचा राहिला आहे. गुंतवणूकदारांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सर्वात जास्त बँकिंग शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आजच्या दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स हा 671 अंकांच्या घसरणीसह 59,135 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 17,412 अंकांवर आला आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 10T171814.197

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 10T171814.197

Share Market :  आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशेचा राहिला आहे. गुंतवणूकदारांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सर्वात जास्त बँकिंग शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आजच्या दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स हा 671 अंकांच्या घसरणीसह 59,135 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 17,412 अंकांवर आला आहे.

आजच्या दिवसभराच्या व्यवहारात एफएमसीजी, एनर्जी व कंज्यूमर ड्यूरेबल्स या क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली. याउलट बँकिंग, आयटी, इंफ्रा, हेल्थकेअर, ऑईल व गॅस इ. क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. तसेच मिडकॅप व स्मॉलकॅप क्षेत्राच्या शेअर्समध्ये देखील घसरण दिसून आली आहे.

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे: विधान परिषदेतून पवारांचे प्रादेशिक संतुलन

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स हे तेजीसह बंद झाले, तर बाकीचे 35 शेअर्सचा दर हा कोसळला आहे. याउलट सेंसेक्सच्या 30 शेअर्सपैकी 9 शेअर्स हे तेजीसह बंद झाले तर 21 शेअर्स हे घसरणीसह बंद झाल आहेत.

Love Jihad च्या मुद्द्यावरून गदारोळ, विधिमंडळात शेलार, आव्हाड भिडले

आजच्या ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्सचा शेअर्स 0.84 टक्के, एनटीपीसी 0.72 टक्के, मारुती सुझुकी 0.70 टक्के, ब्रिटानिया 0.45 टक्के, बीपीसीएल 0.37 टक्के, डॉ रेड्डीज लैब 0.33 टक्के, पावर ग्रिड 0.33 टक्के, टाइटन 0.31 टक्के, सन फार्मा 0.30 टक्के, बजाज ऑटो 0.22 टक्के तेजीसह बंद झाले आहेत.
याउलट अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये 2.92 टक्के, एचडीएफसी बँक 2.58 टक्के, ऑपोलो हॉस्पिटल 2.28 टक्के, इंससइंड बँक 2.14 टक्के, एसबीआय 2.07 टक्के हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Exit mobile version