Share Market : शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मर्यादित व्यवहार करताना दिसला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टी-सेन्सेक्समध्ये (Nifty-Sensex)घसरण दिसून आली. मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी चांगली खरेदी झाली. तर निफ्टी बँक(Nifty Bank), पीएसयू बँक, पीएसई शेअर्समध्ये खरेदी दिसली तर एफएमसीजी, आयटी, फार्मा शेअर्समध्ये दबाव दिसून आला.
Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे दरवाजे बनवण्याऱ्या MD ची सत्व परीक्षा
शेअर बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 259.58 अंकांच्या किंवा 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 71,423 च्या पातळीवर बंद झाला. NSE चा निफ्टी 50.60 अंकांच्या किंवा 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 21,571 च्या पातळीवर बंद झाला.
‘मविआ’ जास्तीत जास्त जागा जिंकेल; कॉंग्रेस प्रभारीचं जागावाटपाबाबतही सूचक वक्तव्य, म्हणाले…
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि फक्त 6 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये आज सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ झाली. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 2.30 टक्क्यांची वाढ दिसून आली.
बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने शेअरमध्ये ही वाढ दिसली आहे. ICICI बँक 1.24 टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानी आहे आणि तिचे तिमाही निकाल देखील आज समोर आले आहेत.
तसेच पॉवर ग्रिड 0.76 टक्के, एसबीआय 0.61 टक्के आणि एचडीएफसी बँक 0.54 टक्क्यांनी वधारले. अॅक्सिस बँक 0.15 टक्क्यांनी वाढून बंद झाली आहे.
निफ्टी शेअर्सचा विचार केला तर 50 पैकी 20 शेअर्स वाढीसह बंद झाले. आणि 30 शेअर्सचे ट्रेडिंग घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्सपैकी कोल इंडिया 4.11 टक्क्यांनी वाढला, अदानी पोर्ट्स 3.34 टक्क्यांच्या वाढीसह तर कोटक महिंद्रा बँक 2.59 टक्क्यांच्या वाढीसह आणि अदानी एंटरप्रायझेस 2.48 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तसेच ICICI बँक 1.24 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.