Soap & shampoo veg or non-veg? A dot on the pack will now tell you : साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीज शाकाहारी आहेत की मांसाहारी हे आता पॅकेटवरील रंगीत ठिपक्यावरून स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारने (Central Goverment) या उत्पादनांवर शाकाहारी आणि मांसाहारी घटकांच्या उत्पत्तीची माहिती देणारे चिन्ह लावणे बंधनकारक केले आहे. ग्राहक व्यवहार विभागाने 21 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केलीय. (soap-shampoo-veg-or-non-veg-a-dot-on-the-pack-will-now-tell-you)
Legal Metrology (Packaged Commodities) Fourth Amendment Rules, 2026 अंतर्गत हा बदल करण्यात आलाय. या नियमांद्वारे Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
हिरवा ठिपका म्हणजे शाकाहारी, लाल किंवा तपकिरी म्हणजे मांसाहारी
नव्या नियमांनुसार, शाकाहारी उत्पादनांच्या पॅकेजिंगवर हिरवा ठिपका लावावा लागेल. उत्पादनात मांसाहारी साहित्याचा वापर झाल्यास उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी ठिपका बंधनकारक करण्यात आला आहे. हा रंगीत ठिपका पॅकेजच्या Principal Display Panel म्हणजेच उत्पादनासंदर्भातील अनिवार्य माहिती प्रदर्शित केली जाणारी पॅकेजची मुख्य जागा, त्याच्या वरच्या भागात लावावा लागणार आहे.
कोणत्या उत्पादनांना लागू?
या नियमांतर्गत साबण, शॅम्पू, टूथपेस्ट यांसह इतर कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनातील घटकांबाबतच्या माहिती पॅकेजिंगवरून अधिक स्पष्ट मिळणार आहे.
नव्या नियमांमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
अधिसूचनेद्वारे नियम 6 मध्ये 6 (4A) (d) हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित उत्पादनाच्या पॅकेजिंगवर निर्धारित रंगाचे चिन्ह लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलामागील धोरणात्मक स्पष्टीकरण अधिसूचनेत देण्यात आलेले नाही. तसेच या सुधारणेद्वारे नियम 6 मधील उप-नियम (8) वगळण्यात आला आहे.
नियम कधीपासून लागू?
केंद्र सरकारने ही अधिसूचना 21 सप्टेंबर 2026 रोजी राजपत्रात (Official Gazette) प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, हे नवे नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच लागू झाले आहेत. केंद्र सरकारने Legal Metrology Act, 2009 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे बदल केले आहेत.
