Sonam Wangchuk : नीट पेपर फुटी प्रकरणात आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता यांच्या निषेधार्थ गेल्या 26 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी रुग्णालयता उपोषण सोडले आहे.
सोनम वांगचुक यांनी स्वतः ट्विट करून उपोषण (Sonam Wangchuk Hunger Strike) मागे घेतल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा (J.P. Nadda) आणि डॉ. जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) तसेच ‘लेह ॲपेक्स बॉडी’च्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले उपोषण सोडले. आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई दिली जाईल आणि संसदेत यावर चर्चा केली जाईल याबाबत सरकारकडून सकारत्मक प्रतिसाद आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांना आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी लिहिले, “मी सोनम जी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दिनचर्येबाबत डॉक्टरांचा सल्ला पाळावा आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा प्राप्त करावे.” त्यांनी सोनम वांगचुक यांच्या जलद आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली.
Mr. Sonam Wangchuk has ended his fast after Union Ministers Shri JP Nadda and Shri Jitendra Singh met him at Medanta Hospital, Gurugram, and assured him of the government’s commitment to address the concerns.
Shri JP Nadda said:
“The government is positive on not registering… pic.twitter.com/lVSr83Af8y
— BJP (@BJP4India) July 23, 2026
65 खासदारांची विनंती
सोनम वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा पत्रे पाठवून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. देशात संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी आणि विविध अटींबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
मैं सोनम जी से आग्रह करता हूँ की वो डॉक्टरों की सलाह के अनुसार अपनी दिनचर्या रखें और जल्द से जल्द अपना पुराना वज़न फिर से प्राप्त करें।
मैं प्रभु से प्रार्थना करता हूँ कि सोनम जी स्वस्थ रहें।@Wangchuk66 @GitanjaliAngmo
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026
केंद्रीय मंत्र्यांची मेदांता रुग्णालयात भेट
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रात्री उशिरा त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही पोलीस किंवा कायदेशीर कारवाई करू नये, बाधित कुटुंबांना नुकसानभरपाई द्यावी आणि संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा करावी, अशा मागण्या वांगचुक यांनी केल्या होत्या.
सहा राशींना होणार फायदा मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल? –
संसदेत चर्चा आणि सुरक्षेच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पेपर लीक मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असून, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टीकरण जे.पी. नड्डा यांनी दिले.
