Modi 3.0 : मोदी सरकारची पहिलीच अग्नीपरीक्षा; 24 जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे.

New Parliament

New Parliament

नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत असून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. या विशेष अधिवेशनकाळात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारचा रोडमॅप कसा असेल याची रूपरेषा सांगतील. (First session of 18th Lok Sabha from June 24, Rajya Sabha June 27)

रिजिजू काय म्हणाले ?

करिने रिजिजू यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवनिर्वाचित सदस्यांचे शपथग्रहण, अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि त्यावरील चर्चेसाठी 18 व्या लोकसभेचे पहिले  विशेषअधिवेशन  24 जून 2024 ते 3 जुलै 2024 या कालावधीत बोलावण्यात आले आहे. याशिवाय राज्यसभेचे 264 वे अधिवेशनही 27 जूनपासून सुरू होऊन 3 जुलैला संपणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाची ओळख करून देतील असाही अंदाज आहे.

Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी

PM मोदींची विरोधकांसमोर अग्रीपरीक्षा

लोकसभा निवडणुकीत NDA आघाडीच्या कामगीनंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव चर्चेत इंडिया आघाडी (India Alliance) आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहे. यावेळी विरोधकांच्या कोंडीमुळे मोदींना अग्नीपरीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नदेखील केला जाऊ शकतो.

विकासासाठी मोदींची मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही; पवारांचं बारामतीत मोठं विधान

अध्यक्षपदासाठीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची

543 जागांच्या लोकसभेत एनडीएकडे बहुमत आहे. तर, विरोधी इंडिया आघाडीदेखील लोकसभेतील त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल उत्साहित आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एनडीए आघाडीकडून सावध पवित्रा घेतला जाऊ शकतो.

Exit mobile version