SPS Oberoi : ‘UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्याला लग्नासाठी 125 कोटींच्या हुंड्याची ऑफर’…मेजर ओबेरॉय यांचा खळबळजनक दावा

UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्याला लग्नासाठी 125 कोटी रुपयांच्या हुंड्याची ऑफर दिल्याचा दावा युपीएससी मार्गदर्शक मेजर एसपीएस ओबेरॉय यांनी केलायं.

SPS Oberoi

SPS Oberoi

SPS Oberoi News : युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याला 125 कोटी रुपयांच्या हुंड्याची ऑफर दिली असल्याचा दावा युपीएससी मार्गदर्शक मेजर एस.पी.एस. ओबेरॉय (SPS Oberoi) यांनी एका मुलाखतीत केलायं. ओबेरॉय यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या दाव्यामुळे देशात आजही हुंडा प्रथा अस्तित्वात असून या प्रथेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नेटककऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या जात आहे.

या मुलाखतीत पुढे बोलताना मेजर ओबेरॉय म्हणाले, अनेक संस्थांनी विद्यार्थ्यांना युपीएससी उत्तीर्ण करण्यासाठीचा ठेका उचललेला आहे. एका युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याला 125 कोटी रुपयांच्या हुंड्यांची ऑफर दिली होती. माझा जावई आयपीएस आहे ही एक सामाजिक प्रतिष्ठा मानून ही ऑफर दिली असल्याचा दावा ओबेरॉय यांनी केला. ओबेरॉय यांनी हा दावा करताच अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलायं.

तसेच सध्या समाजात शिक्षण, उच्चपदस्थ आणि सामाजिक प्रतिष्ठा यांच्या आधारावर लग्नाला अर्थिक व्यवहाराचं स्वरुप दिलं जात आहे. युपीएससीसारख्या प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवून आयएएस किंवा इतर उच्च पदांवर पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना समाजात प्रचंड प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे याच प्रतिष्ठेमुळे अनेक श्रीमंत कुटुंबे अधिकाऱ्यांशी नातेसंबंध जोडण्यासाठी मोठमोठ्या आर्थिक ऑफर्स देण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचंही ओबेरॉय म्हणाले आहेत. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केलायं तर अशा मानसिकतेवर कठोर शब्दांत टीका केलीयं.

2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…

या घटनेमुळे देशात अजूनही हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित समाजघटकांमध्येही लग्नाला आर्थिक व्यवहाराचे स्वरूप दिले जात असल्याची टीका अनेकांनी केलीयं. सोशल मीडियावर अनेकांनी या मानसिकतेवर संताप व्यक्त करत, ‘यशस्वी अधिकाऱ्यांची किंमत पैशांत मोजली जात आहे का?’ असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, एकीकडे हुंडा प्रथा बंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत तर दुसरीकडे आजही देशात हुंडासारख्या परंपरा सुरुच असतील तर या प्रथेविरोधात कडक कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे.

Exit mobile version