Download App

ब्रेकिंग : पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करा; केंद्राचे ओटीटी आणि मीडिया प्लॅटफॉर्मना कडक निर्देश

  • Written By: Last Updated:

Stop Pakistani content immediately Centre to OTTs, media streaming platforms : राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना दिले आहेत. पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सात्यत्याने कठोर पावले उचलत असून, ७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला. यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली होती. त्यानंतर आता  राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना दिले आहेत

 

केंद्राचे निर्देश नेमके काय?

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची आहे. हीच बाब लक्षात घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना तात्काळ पाकिस्तानमधील सर्व प्रकारचा प्रसारित होणारा कंटेट भारतात दाखवणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Video: ‘अल्लाह हमारी हिफाजत करे’, पाकिस्तानच्या संसदेत धाय मोकलून रडला खासदार

केंद्राच्या या निर्देशानंतर आता भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म, यूट्यूब आणि सर्व प्रकारच्या ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंट दिसणार नाहीये. भारतातच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी कलाकारांना मोठा दणका बसणार आहे.

Video : “पाकिस्तानच्या एअर डिफेन्सला नष्ट केलं, आता सुधरा नाहीतर..” भारताचा पाकला निर्वाणीचा इशारा

“राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून, सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि मध्यस्थांना पाकिस्तानमध्ये बनवलेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया कंटेंट, जे सबस्क्रिप्शन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून उपलब्ध आहेत, त्वरित बंद करण्याचे सांगण्यात आले आहे.

follow us