Download App

शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स-निफ्टीची गरुडझेप; गुंतवणूकदार मालामाल

Share Bazar : आज आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Bazar)चांगला ठरला आहे. ऑटो, आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात ही वाढ झाली. निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा 22 हजारचा आकडा पार केला आहे. आजच्या ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स (Sensex)376 अंकांच्या उसळीसह 72 हजार 426 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या उसळीसह 22,040 अंकांवर बंद झाला.

राजकोटमध्ये अश्विनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारा 9वा गोलंदाज

शेअर बाजार मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे बाजार भांडवलात मोठी झेप घेतली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 389.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. गेल्या सत्रात 387.35 लाख कोटी रुपये होते. आजच्या सत्रात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शिवाजी पार्कवर सभा घेणाऱ्यांना आता रस्त्यावर सभा घेण्याची वेळ; उदय सामंतांचा ठाकरेंवर घणाघात

आजच्या व्यवहारात आयटी, ऑटो, फार्मा, बँकिंग, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील समभागात तेजी दिसून आली. तेल आणि वायू आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये घट झाली आहे. आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स तेजीने बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 समभाग वाढीसह तर 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 50 निफ्टी समभागांपैकी 38 समभाग वाढीसह बंद झाले तर 12 समभाग तोट्यासह बंद झाले.

आजच्या व्यवहारात विप्रो 4.79 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3.96 टक्के, लार्सन 2.68 टक्के, टाटा मोटर्स 2.02 टक्के, मारुती सुझुकी 1.93 टक्के, इन्फोसिस 1.48 टक्के, नेस्ले 1.38 टक्के, एचयूएल 1.02 टक्के, जेएसडब्ल्यू 1.02 टक्के वाढीसह बंद झाले. पॉवर ग्रिड 2.36 टक्के, एसबीआय 0.90 टक्के, रिलायन्स 0.70 टक्के, एनटीपीसी 0.59 टक्के घसरणीसह बंद झाले.

follow us

वेब स्टोरीज