Indian Stock Market : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका भारतीय शेअर बाजाराला देखील बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळतेय. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता मात्र आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी (3 मार्च) भारतीय शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदांना (Indian Stock Market) मोठा दिलासा मिळाला आहे. आज सेन्सेक्स 789 अंकांनी वाढला असून सध्या तो 78,355.87 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 आज 209.60 अंकांनी वाढली असून सध्या 24,237,65 वर व्यवहार करत आहे.
बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही 1 % वाढीसह उघडले. सुरुवातीपूर्वी दोन्ही निर्देशांक 1% ते 1.5% पर्यंत वाढले. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल दिसून आला आहे. सोमवारी, अमेरिका आणि युरोपीय बाजारही सुरुवातीच्या विक्रीनंतर सावधगिरीने बंद झाले. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून आशियाई बाजारांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजारात 5% पर्यंत वाढ झाली. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत सुरू असलेला तणाव लवकरच संपू शकतो आणि तेलाच्या किमती कमी ठेवण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पावले उचलू शकते अशी माहिती दिल्यानंतर शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
ट्रम्प काय म्हणाले?
इराणसोबत सुरू असलेले युद्ध लवकरच संपू शकते. अमेरिका तेलाशी संबंधित काही निर्बंध शिथिल करू शकते आणि अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकरना सुरक्षा प्रदान करू शकते असं डोनाल्ड ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांच्या या विधानानंतर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत गुंतवणूकदारांचा असा विश्वास होता की जर युद्ध लवकर संपले आणि तेलाचा पुरवठा सामान्य झाला तर ऊर्जा किमतींवरील दबाव कमी होईल.
पुढील टी-20 विश्वचषक कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या सर्व काही-
तेल बाजारात चढउतार
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल $119 पर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु ट्रम्प यांच्या विधानानंतर, बाजारातील भावना उलटल्या आणि किमती प्रति बॅरल $90 च्या खाली घसरल्या
