Domestic Violence Case Supreme court : पत्नीला स्टूपिड, युजलेस, बेअक्कल म्हणणे क्रूर अपराध नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.वी नागरत्ना, मनमोहन यांच्या बेंचने दिलीयं. पतीने पत्नीला या शब्दांत बोलणं म्हणजे क्रूर अपराध नसून या प्रकरणाला गुन्ह्याचा रंग देऊन पत्नीच्या आत्महत्येचे कारण म्हणता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे आता पतींविरोधात खोट्या केसेस दाखल करणाऱ्या पत्नींवर आळा बसणार असल्याचं बोललं जातंय.
संबंधित महिलेच्या वडिलांनी पतीच्या सासरवाडीच्या लोकांवर मानसिक, शारिरीक छळाचे आरोप केले होते. यासोबत हुंडा मागितल्याचाही आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणात हुंडासंदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नसून या आरोपांचा आणि मुलीच्या मृत्यूचा संबंध दिसून येत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.
5 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न…
या खटल्यातील पती आणि पत्नीचा 3 जानेवारी 2021 रोजी विवाह झाला. त्यानंतर दाम्पत्य टोरंटोमध्ये शिफ्ट झाले होते. पत्नीने 11 जून 2023 रोजी छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये मागील एक वर्षांत नोकरी मिळाली नाही, जीवनात नाास झाले असं लिहिलं होतं. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी 30 जून 2023 रोजी सातारा, औरंगाबादमध्ये हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मुलीच्या मृत्यूआधी मुलीला हुंड्यासाठी मानसिक, शारिरीक छळ त्रास दिल्याचं सिद्ध करावे लागेल, तरच ते सत्य मानलं जाईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
मुलीच्या वडिलांकडून करण्यात आलेले आरोप कोणत्याही प्रकारे सिद्ध केलेले नाही. त्यामुळे मुलीचा मृत्यू मानसिक शारीरीक छळ आणइ हुंडाबळीमुळे झालायं, हे सिद्ध होत नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय मुलीच्या सासरच्या मंडळींना जबाबदार धरु शकत नाही. ज्यांनी मुलगी गमावली, त्यांचं दुख: न्यायालय समजू शकेत परंतू पती आणि सासरच्या लोकांनी काही चुकीचं केलेलं नाही तर त्यांना जबाबदार धरु शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय.
