Download App

Breaking news ; सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना कोरोनाची लागण

Supreme Court Corona Update : दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या केसेसमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायाधीशांनाही कोविडची लागण (Corona Update) झाल्याची बाब समोर येत आहे. त्यामध्ये समलिंगी विवाह प्रकरणाच्या (Same-sex marriage case) सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठातील एका न्यायमूर्तींचा समावेश आहे. घटनापीठाच्या न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात समलिंगी विवाह प्रकरणाची सोमवारी सुनावणी होणार नाही. न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खंडपीठातील इतर न्यायाधीशही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती एस रवींद्र भट, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा सध्या कोविड-19 मुळे त्रस्त आहेत, तर न्यायमूर्ती सूर्यकांत आठवडाभरापूर्वी कोरोनातून बरे झाले आहेत. न्यायमूर्ती एस रवींद्र भट हे समलिंगी विवाह प्रकरणात घटनापीठाचा भाग आहेत.

LSG vs GT : गुजरात टायटन्सचा लखनऊवर रोमांचक सामन्यात 7 धावांनी विजय

सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व न्यायाधीशांच्या संपर्कात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर कोणत्याही परिस्थितीत परिणाम होऊ नये, असा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यासाठी रजिस्ट्रीला सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच काही खंडपीठांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

Tags

follow us