Download App

महुआ मोईत्रा प्रकरण शेकलं, खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, पोर्टलचा वापर फक्त खासदारच करणार

  • Written By: Last Updated:

Guideline For MP : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) चांगल्याच चर्चेत आहे. त्यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाल्यानंतर आता खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता फक्त खासदारच लोकसभा पोर्टलचा वापरू शकतात. ते त्यांचा लॉगिन आयडी इतर कोणाशीही शेअर करू शकत नाहीत.

टी-20 ची क्रेझ घटली? सूर्यकुमार यादवच्या पत्रकार परिषदेला फक्त दोनच पत्रकार… 

विशेषत: पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांना टार्गेर करण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महुआ मोईत्रा यांनी कबूल केले की त्यांनी दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा पोर्टलचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला होता. याप्रकरणी मोईत्रा यांची चौकशी सुरू आहे.

संसदेच्या आचार समितीने महुआ मोइत्रा यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस केली आहे. समितीचा अहवाल 6 विरुद्ध 4 मतांनी स्वीकारण्यात आला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या प्रकरणी निर्णय घेणार आहेत. दरम्यान, आता आता पुढील लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी खासदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे

लोकसभा पोर्टलचा वापर फक्त खासदारच करू शकतात.

लोकसभा पोर्टलवरील लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करता येणार नाही.

खासदारांनी संसदेची गुप्तता राखली पाहिजे
प्रश्नोत्तराचे सत्र सुरू होईपर्यंत प्रश्नांची उत्तरे शेअर करू नका.

भारतीय वायुसेनेत 317 जागांसाठी भऱती, 1 लाख 77 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज? 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आरोप

महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची योजना आखली जात असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले. पण असे झाले तर 2024 च्या निवडणुकीपूर्वी महुआसाठी ते फायदेशीर ठरेल. कोलकाता येथे एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत होत्या. मात्र, या कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रा यांनी लाच घेण्याबाबत प्रश्न विचारत त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

काही दिवसांपूर्वी लाच घेतल्याच्या आणि संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपांनी घेरलेल्या खासदार महुआ मोइत्रा यांना त्यांच्या पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोईत्रा यांची कृष्णानगर (नदिया उत्तर) जिल्ह्याच्या पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

आचार समितीनीने केला अहवाल सादर
तपास पूर्ण केल्यानंतर, संसदेच्या नीतिशास्त्र समितीने लाच घेतल्याप्रकरणी आणि संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी महुआविरोधात 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अहवाल पाठवला होता. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करायची याचा निर्णय सभापती घेतील.

 

Tags

follow us