MK Stalin : मुलासाठी बाप मैदानात; उदयनिधींच्या वक्तव्यावर CM स्टॅलिन यांनी सोडले मौन

MK Stalin : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यावर देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच उदयनिधी यांचे वडील आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके. […]

Mk Stalin

Mk Stalin

MK Stalin : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यावर देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच उदयनिधी यांचे वडील आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके. स्टॅलिन (MK Stalin) यांनी यावर प्रथमच भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन (MK Stalin) म्हणाले, उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेलं विधान चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. उदयनिधी यांनी सनातनी विचारांच्या लोकांच्या नरसंहाराचे आवाहन केल्याचे चुकीचे सांगितले जात आहे. सोशल मीडियातील भाजपाच्या झुंडी उत्तर भारतात उदयनिधी यांच्याबद्दल खोटे वक्तव्य पसरवण्याचे काम करत आहेत. नरसंहार हा शब्द तामिळमध्ये किंवा इंग्रजीतूनही उदयनिधी यांनी उच्चारलेला नाही, असा दावा मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला.

‘उदयनिधींच्या वक्तव्याने देशातील 90 कोटी हिंदूंच्या’.. ठाकरे गटानेही फटकारलं !

यानंतर स्टॅलिन (MK Stalin) यांनी पंतप्रधान मोदी यांनाही एक सल्ला दिला. देशाच्या पंतप्रधानांकडे सर्वच तपास यंत्रणांचा अॅक्सेस असतो. त्यामुळे त्यांनी कुणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आधी त्या व्यक्तीने काय म्हटले आहे हे पाहिले पाहिजे. पण, आपले पंतप्रधान उदयनिधींबाबत पसरलेल्या खोट्या विधानांवरच प्रतिक्रिया देत आहेत,असे स्टॅलिन म्हणाले.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन ?

सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ठिकठिकाणी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यानंतरही स्टॅलिन यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणाले होते.

Udayanidhi Stalin : जो कोणी उदयनिधींचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटींचे बक्षीस; परमहंस आचार्यांची घोषणा

सनातन धर्म एचआयव्हीसारखा – ए. राजा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेला गदारोळ अद्याप कायम आहे. अशात आणखी एक विधान वादात सापडले आहे. द्रमुकचे खासदार ए राजा यांनी आता सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. तसंच ए राजा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सनातन धर्माच्या मुद्द्यावर थेट चर्चेचे आव्हान दिले आहे. ए.राजा म्हणाले की, उदयनिधी जे काही बोलले ते फारच थोडे आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यूचा उल्लेख केला, पण हे असे आजार नाहीत ज्यांना समाजात घृणास्पद म्हटले जाते. सनातनची व्याख्या करायची असेल तर एचआयव्ही बघा, सनातन समाजासाठी तेच काम करते.

Exit mobile version