सिंघम स्टाईल अन् आयपीएसची नोकरी सोडून अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले? जाणून घ्या प्रवास

Annamalai leave BJP भाजपचे पोस्टर बॉय राहिलेले के अन्नामलाई हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Annamalai Leave BJP

Annamalai Leave BJP

Tamilnadu Politics Party Annamalai leave BJP his Journey to Join BJP : विधानसभा निवडणुकांपासून देशात चर्चेत असणाऱ्या तामिळनाडूमधून पुन्हा एकदा एका राजकीय भूकंपाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तामिळनाडूमध्ये भाजप पक्ष वाढणारे आणि लोकसभेत भाजपचे पोस्टर बॉय राहिलेले के अन्नामलाई हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आयपीएस अधिकारी असलेले अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले? जाणून घ्या सविस्तर…

पक्ष चिन्ह हटवलं, अन्नामलाई सोडणार भाजपची साथ?

माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तमिळनाडूसह राष्ट्रीय राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अन्नामलाई आणि भाजप यांच्यामध्ये केंद्रीय धोरणांवरून झालेले मतभेद आहेत. तसेच त्यांनी नुकतच त्यांच्या गाडीवरून पक्षाचे चिन्ह काढून टाकल्याने अन्नामलाई भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे.

अन्नामलाई भाजपमध्ये कसे आले?

अन्नामलाई यांनी मे 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला आणि ऑगस्ट 2020 मध्ये भाजपात प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत अन्नामलाईंनी मागे बघून बघितलेले नाही. 9 जुलै 2021 रोजी भाजपने अन्नामलाई यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याची कमान दिली. त्यानंतर त्यांनी पक्षाची पाळमुळं तळागाळापर्यंत नेली. भाजप घरोघरी नेण्यासाठी अन्नामलाई यांनी 2023 च्या जुलैमध्ये ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) यात्रा काढली होती. या यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला तर, याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) उपस्थितीत झाला होता. अन्नामलाई यांच्या या एका यात्रेने त्यांची पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली होती.

जनतेचे प्रेम अन् मंचावर उपस्थित मोदीही झाले आनंदी

‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) या यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी उपस्थितांनी अन्नामलाई यांचे जोरदार स्वागत केले. नागरिकांचे अन्नामलाई यांच्यावरील जीवापाड प्रेम पाहून खुद्द मोदीही भारावून गेले होते. त्यावेळी मोदींनी त्यांच्या शेजारी बसलेल्या अन्नामलाई यांची पाठ अनेकदा थोपटली होती. मोदींच्या या कौतुकामुळे अन्नामलाई यांच्या ‘एन मन, एन मक्कल’ (माय लँड, माय पीपल) ही यात्रा किती यशस्वी झाली असेल याचा अंदाज बांधता येईल.

पक्ष चिन्ह हटवलं, अन्नामलाई सोडणार भाजपची साथ? 3 जूनला जाहीर करणार नव्या पक्ष स्थापनेचा निर्णय

अन्नामलाई तामिळनाडूतील भाजपचा सर्वात मोठा चेहरा अद्यापही आहेत यात शंका नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभेत भाजपनं तामिळनाडूत 2 ते 3 जागांच्या माध्यामातून चंचू प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अन्नामलाई यांचा करिष्मा कामी आल्याचे अधोरेखित झाला. हा करिष्मा कायम राहिल्यास भविष्यात तामिळनाडूत भाजप एकहाती सत्तेचे दरवाजे उघडेल असा विश्वास यामुळे निर्माण झाला होता.

जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आयुष्यभर लोकसेवा करणारे नेतृत्व; शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव

मात्र त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून अन्नामलाई आणि भाजप यांच्यामध्ये केंद्रीय धोरणांवरून झालेले मतभेद आहेत. अण्णामलाई यांनी अलीकडेच केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणावर सोशल मीडियावर उघडपणे आक्षेप घेतला होता. त्यानंतर ते भाजप नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा वेगाने पुढे आल्या. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अण्णामलाई यांनी या सर्व अफवांबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

कारने एकमेकांना धडक देताच अंधाधुंद गोळीबार; पुण्यात पुन्हा गँगवार, एकाचा मृत्यू

तर आता त्यांनी थेट सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असून, 3 जून रोजी ते मोठा निर्णय जाहीर करू शकतात, अशी देखील चर्चा आहे. दरम्यान याबाबत स्वत: अन्नामलाई यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी केवळ “दोन दिवसांची प्रतीक्षा करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,” एवढेच सांगितले.

Exit mobile version