Tamilnadu Politics Party symbol removed, will Annamalai leave BJP Decision to form new party to be announced : विधानसभा निवडणुकांपासून देशात चर्चेत असणाऱ्या तामिळनाडूमधून पुन्हा एकदा एका राजकीय भूकंपाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तामिळनाडूमध्ये भाजप पक्ष वाढणारे आणि लोकसभेत भाजपचे पोस्टर बॉय राहिलेले के अन्नामलाई हे भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
पक्ष चिन्ह हटवलं, अन्नामलाई सोडणार भाजपची साथ?
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तमिळनाडूसह राष्ट्रीय राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अन्नामलाई आणि भाजप यांच्यामध्ये केंद्रीय धोरणांवरून झालेले मतभेद आहेत. तसेच त्यांनी नुकतच त्यांच्या गाडीवरून पक्षाचे चिन्ह काढून टाकल्याने अन्नामलाई भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे.
3 जूनला जाहीर करणार नव्या पक्ष स्थापनेचा निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णामलाई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला असून, 3 जून रोजी ते मोठा निर्णय जाहीर करू शकतात, अशी देखील चर्चा आहे. दरम्यान याबाबत स्वत: अन्नामलाई यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी केवळ “दोन दिवसांची प्रतीक्षा करा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,” एवढेच सांगितले.
