Telangana Congress Candidate List: केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Elections) काँग्रेसने (Congess) शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसह 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणाच्या निवडणूकीत कॉंग्रेस आणि बीआरएस (BRS) यांच्या काटे की टक्कर होणार आहे.
Pak vs SA: रोमहर्षक सामन्यात आफ्रिका एका विकेटने जिंकली ! पाकिस्तानचा गाशा गुंडाळला?
खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) शुक्रवारी तेलंगणा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पक्षाने 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी माणिकराव ठाकरे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी आणि इतर नेते उपस्थित होते.
मोहमद्द अझरूद्दीन यांना हैदराबाद शहरातील जुबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार मधु गौर यक्षी यांना लाल बहादूर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या विरोधात पूजाला हरिकृष्णा यांना सिद्धीपेठ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेसने मुनुगोडेमधून राजगोपाल रेड्डी, महबुबादमधून मुरली नाईक आणि अंबरपेटमधून रॉबिन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील 119 पैकी 100 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
मोहम्मद अझरुद्दीन यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून लोकसभा निवडणूक जिंकली. अझरुद्दीन हे सध्या तेलंगणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.
आतापर्यंत किती उमेदवारांची घोषणा झाली?
119 सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी काँग्रेसने आतापर्यंत 100 उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात पहिल्या यादीत ५५ तर दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत. अशा स्थितीत उर्वरित जागांवर पक्ष लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे.
बीआरएसला तेलंगणात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी चांगलाच जोर लावावा लागणार आहेत. तर कॉंग्रेसला सत्तेतून बीआरएसला खेचण्यासाठी मोठी ताकद लावाली लागणार आहे.
गेल्या निवडणुकीत कोणाला किती जागा?
तेलंगणातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत KCR यांच्या BRSने बहुमत मिळविले होते. BRS ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागांवर चा फटका बसला होता.
याशिवाय असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने सात जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ एक जागा मिळाली होती.