4 कोटींचे सोने, 10 फ्लॅट्स, व्यावसायिक इमारती ; भ्रष्टाचारी सरकारी अभियंत्याकडे तब्बल 150 कोटींची संपत्ती

Telangana Engineer: निवासी फ्लॅट्स, व्यावसायिक इमारती, बांधकामाधीन अपार्टमेंट प्रकल्प, सोने, बँक ठेवी, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या आहेत.

ACB TELEGANA

ACB TELEGANA

Telangana Engineer Found With Rs 150 Crore Assets : सरकारी अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे नेहमीच प्रकरणे उघडकीस येतात. एका सरकारी अभियत्यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी (ACB) विभागाने कारवाई केलीय. या अधिकाऱ्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांची संपत्ती उघडकीस आलीय. ही संपत्ती शोधताना एसीबीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दमछाक झालीय. निवासी फ्लॅट्स, व्यावसायिक इमारती, बांधकामाधीन अपार्टमेंट प्रकल्प, सोने, बँक ठेवी, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या आहेत.

ही कारवाई तेलंगणातील अभियंता वेंकट रमणा याच्यावर झालीय. तो रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (REDCO), खैरताबाद, हैदराबाद येथील विभागीय अभियंता (Divisional Engineer) आहे. त्यांच्या विरोधात उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे

एसीबीने रमणा यांचे निवासस्थान, कार्यालय तसेच त्यांच्या नातेवाईक, सहकारी आणि कथित बेनामी व्यक्तींशी संबंधित एकूण आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा तपास सुरू करण्यात आला असून, सेवाकाळात भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवल्याचे पुरावे एसीबीला मिळाले आहेत.


छाप्यात काय-काय आढळले ?

सेरिलिंगमपल्ली आणि कुकटपल्ली येथे चार निवासी फ्लॅट्स सापडले आहे. त्याची किंमत 1.23 कोटी रुपये इतकी आहे. तर
अंजनेयनगर एक व्यावसायिक इमारत आहे. त्याची किंमत1 कोटी 82 लाख इतकी आहे. गुट्टाला बेगमपेट सेरिलिंगमपल्ली येथे व्यावसायिक इमारत आहे. त्याची किंमत 2.90 कोटी रुपये इतकी आहे. रमणा यांनी पत्नीच्या नावावर नोंदणीकृत चार बांधकाम कंपन्यांमार्फत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. अंजनेयनगर आणि मूसापेट येथे 10 निवासी अपार्टमेंट प्रकल्प उभारले जात आहे. त्यामध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.


4 कोटींचे सोने, बँक ठेवी आणि वाहने

52.02 लाख रुपयांच्या बँक ठेवी आढळून आले आल्या आहेत. तर 2.094 किलो सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 4 कोटी रुपये
किया, महिंद्रा आणि मारुती बलेनो अशी तीन वाहने, एकूण किंमत सुमारे 45 लाख रुपये, घरगुती वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अंदाजे 30 लाख रुपयांचे आहेत. तर सुमारे 2.5 लाख रुपये किमतीच्या 20 मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. एसीबीने आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेचे अधिकृत मूल्य 27.65 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. पण मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य 100 ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते.


यापूर्वीही लाच घेताना रंगेहाथ पकडले होते

रमणा यांना यापूर्वी 12 डिसेंबर 2019 रोजीही एसीबीने लाचलुचपत प्रकरणात रंगेहाथ अटक केली होती. त्या वेळी ते सुपरिंटेंडिंग इंजिनिअर (ऑपरेशन्स), सायबर सिटी सर्कल, हैदराबाद कार्यालयात विभागीय अभियंता (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. अंतिम अंदाजपत्रक मंजुरीसाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या झडतीत 26.52 लाख रुपये रोख आणि 22.60 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. त्या प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version