जम्मू-कश्मीर : सेनेचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवादी हल्ला, पाच जणांना वीरमरण

पुंछ : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. PTI वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. याच पाच जवान शहीद झाले आहेत. (Terrorists fire at Army vehicle carrying jawans in Jammu and Kashmir’s Poonch district) Terrorists fire at Army vehicle […]

Attack

Attack

पुंछ : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. PTI वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. याच पाच जवान शहीद झाले आहेत. (Terrorists fire at Army vehicle carrying jawans in Jammu and Kashmir’s Poonch district)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,, पूँछ जिल्ह्यातील ढेरा की गली येथे काही अतिरेकी दडून बसल्याची खबर सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम राबविण्यासाठी एक ट्रक आणि एका जिप्सीमधून लष्कराचे जवान निघाले होते. बुफ्लियाज या गावाजवळ धात्यार मोर्ह येथे दबा धरून बसलेल्या सशस्त्र अतिरेक्यांनी ताफ्यावर हल्ला चढविला. याच हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ढेरा की गली हा भाग अत्यंत घनदाट असून तो राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. 20 एप्रिल रोजी याच परिसरात अतिरेकी हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर मे महिन्यात येथून जवळ असलेल्या चामरेरच्या जंगलात पाच जवान शहीद झाले, तर मेजर हुद्द्याचा एक अधिकारी जखमी झाला होता. दरम्यान, आजच्या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

पुलवामाची पुनरावृत्ती?

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सैन्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते. या स्फोटासाठी 300 किलो आरडीएक्स वापरण्यात आल्याचाही दावा करण्यात आला होता.

Exit mobile version