थलपतीच्या घरी जल्लोष, निकालापूर्वीच ‘विजयी भव:’ ची भविष्यवाणी करणारे ज्योतिषी ‘राधन पंडित’ कोण?

Thalapathy Vijay विजयाच्या उत्सवात फुलांचा गुच्छ आणि मानाची शाल घेऊन थलपतीच्या घरी पोहोचलेले राधन पंडित हे काही सामान्य नाव नाही.

निकालाआधीच वर्तवला होता विजय! तामिळनाडूचा नवा 'किंग' ठरवणाऱ्या ज्योतिषींचा थलपतीच्या घरी सन्मान

निकालाआधीच वर्तवला होता विजय! तामिळनाडूचा नवा 'किंग' ठरवणाऱ्या ज्योतिषींचा थलपतीच्या घरी सन्मान

Thalapathy Vijay Victory Who Is Astrologer Radhan Pandit : तमिळ चित्रपटसृष्टीचे महानायक आणि आता तामिळनाडूच्या राजकीय पटलावर ‘किंग’ म्हणून उदयास आलेले थलपती विजय यांच्या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण आहे. विजय यांचा तमिझगा वेत्री कळघम (TVK) पक्ष विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड आघाडीमुळे आता सत्तेच्या उंबरठ्यावर असून, विजय यांचे मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित झाले आहे. या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच, विजय यांच्या घरी एका विशेष व्यक्तीच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य राधन पंडित.

विजयाचा गुलाल आणि भावूक क्षण

निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट होताच विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी आनंदाला उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये विजय यांचे आई-वडील आणि कुटुंबीय आपल्या मुलाचा विजय साजरा करताना मोठ्याने ओरडत आणि आनंदाने उड्या मारताना दिसत आहेत. विजयाचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वी संपूर्ण कुटुंब मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, जी आता सार्थ ठरताना दिसत आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यानेही ट्विटरच्या (X) माध्यमातून विजयचे अभिनंदन करताना, “लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास पाहून आनंद झाला,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत राधन पंडित?

विजयाच्या उत्सवात फुलांचा गुच्छ आणि मानाची शाल घेऊन थलपतीच्या घरी पोहोचलेले राधन पंडित हे काही सामान्य नाव नाही. त्यांनी विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी बऱ्याच काळापूर्वी केली होती, जी आज तंतोतंत खरी ठरली आहे. राधन पंडित यांचा राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभव अत्यंत दांडगा आहे. राधन पंडित यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेत्या जयललिता यांचे आध्यात्मिक सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांना ज्योतिषशास्त्रात त्यांना 40 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. जयललिता आणि विजय यांच्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक दिग्गज राजकारण्यांना वेळोवेळी ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन केले आहे.

भविष्यवाणीवर शिक्कामोर्तब

ज्यावेळी विजय यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, तेव्हा अनेक राजकीय विश्लेषकांनी शंका उपस्थित केली होती. मात्र, त्याच वेळी राधन पंडित यांनी विजय यांच्या विजयाचा ठाम दावा केला होता. आज तामिळनाडूच्या जनतेने मतांच्या रूपाने विजय यांच्यावर विश्वास दर्शवल्यामुळे, त्यांच्या विजयाची अचूक भविष्यवाणी करणारे राधन पंडित पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Exit mobile version