Prime Minister Narendra Modi speech : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 17 व्या लोकसभेत केलेल्या कामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला. यावेळी ते भावनिक झाले होते. दरम्यान, यावेळी बोलतांना मोदींनी म्हणाले की, 17 व्या लोकसभेने (17th Lok Sabha) विविध विक्रम नोंदवले. या काळात केलेल्या कामामुळे अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली.
नाशिकची ‘रावळगाव शुगर्स’ रिलायन्सच्या मालकीची : अंबानी बनवणार बच्चे कंपनींचे फेवरेट चॉकलेट्स
आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, 17 व्या लोकसभेच्या पाच वर्षांत आपण आपला वेळ देशासाठी समर्पित केला. या पाच वर्षांत देशाने रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म पाहिलं. रिफॉर्मपासून परपॉर्म आणि परफॉर्मपासून ट्रान्सफर्म पाहता येणं हे खूप दुर्मिळ आहे. एक नवा विश्वास तयार होत आहे. हे सर्व आज 17 व्या लोकसभेपासून देश अनुभव करत आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की 17वी लोकसभा देश नक्कीच लक्षात ठेवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
PM Modi : 17 व्या लोकसभेला मोदींचे अखेरचे भावनिक संबोधन, कृतज्ञता व्यक्त करत मानले सर्वांचे आभार
पुढं बोलतांना मोदी म्हणाले की, जम्मू काश्मिमधील लोक सामाजिक न्यायापासून वंचित होते. त्यांना आपण न्याय दिला. काश्मीरमधील कलम 370हटवण्यात आले. आंतकवाद देशाच्या छातीवर गोळ्या झाडतं आलं होतं. त्यात अनेक वीर जवान शहीद व्हायचे. मात्र, 17 व्या लोकसभेनं आतंकवादाविरुध्द कठोर कायदे करून भारताला आतांकवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केल्याचं मोदी म्हणाले.
17 व्या लोकसभेच्या कार्यकाळात राम मंदिर उभं राहिलं. शिवाय, सर्वजण नवीन संसदेच्या स्थापनेची चर्चा करत होते.पण कोणाीच संससद तयार केलं नाही. अशावेळी अध्यक्षांच्या निर्णयक्षमतेमुळे आपल्या सरकारने नवी संसद उभी केली.
या नवीनं संसदेनं तिहेरी तलाक कायद्यापासून महिला शक्तीला मुक्त देण्याचं काम केलं. नारीशक्तीला सक्षम करण्याचं काम आपण केलं.
आगामी 25 वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. राजकारण, महत्त्वाकांक्षा आपल्या जागी. पण देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत. हा देश अपेक्षित परिणाम साध्य करेल. महात्मा गांधींनी मिठासाठी सत्याग्रह केला. तेव्हा अनेकांनी ही फार छोटी घटना वाटली. मात्र, याच मिठाच्या सत्याग्रहानं स्वातंत्र्य चळवळ उभी करून स्वातंत्र्य मिळवून दिलं. देश आज अशाच वाटेवर आहे. तरुणांसाठी ही पाच वर्ष खूप महत्वाची ठरली. व्यवस्थेत पारदर्शीपणा आला. ज्या गोष्टी तरुणांना चिंतेत टाकत होत्या, त्यावर कठोर कायदे केले, असं मोदी म्हणाले.