The killing of a pregnant SWAT commando : दिल्ली पोलीस दलातील 27 वर्षीय महिला SWAT कमांडो काजल चौधरी हिच्या निर्घृण हत्येने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चार महिन्यांची गर्भवती असलेल्या काजलवर तिच्याच पतीने डंबेलने प्राणघातक हल्ला केला. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेवर माजी IPS अधिकारी आणि दिल्लीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती कमांडो होती, पण तिचा नवरा तिला मारहाण करून मारतो. प्रश्न स्त्री सक्षमतेचा नाही, तर प्रश्न पुरुष घडवण्याचा आहे’ असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना किरण बेदी म्हणाल्या, आपण आपल्या मुलांचं संगोपन कसं करतो? आपल्या घरात, शाळांमध्ये आपण कोणत्या प्रकारची मुलं आणि पुरुष घडावर आहोत? सगळं दोष हा आपल्या संगोपनात आहे. मुलींना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तितकेच मुलांना संवेदनशील, जबाबदार आणि सन्मान देणारे पुरुष बनवणे देखील गरजेचे आहे.
केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रात महसुली तूट; लाडकी बहीण’सारख्या योजनांवर अप्रत्यक्ष ताशेरे
घटनेचा तपशील पहिला तर, 22 जानेवारी रोजी आर्थिक वादातून काजोलचा पती अंकुर, जो संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्याने तिच्या डोक्यावर डंबेलने जोरदार हल्ला केला. त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. काजलचा भाऊ निखिल, जो पार्लमेंट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्याने गंभीर आरोप केले आहेत. हल्ल्याच्या वेळी काजल त्याच्याशी फोनवर बोलत होती. फोनवरच तिच्यावर होणारी मारहाण ऐकू येत होती, असा दावा निखिलने केला आहे. त्याने सासू आणि दोन मेहुण्यांकडून हुंड्यासाठी सातत्याने छळ केला जात असल्याचाही आरोप केला आहे.
याप्रकरणी अंकुरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अंकुरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काजल चौधरी 2022 मध्ये दिल्ली पोलीस दलात भरती झाली होती. ती विशेष शस्त्रे आणि रणनीती अर्थात SWAT टीममध्ये कार्यरत होती. 2023 मध्ये तिने अंकुरशी विवाह केला होता. या जोडप्याला डिड वर्षांचा मुलगा आहे.
ही घटना केवळ एका महिलेचा मृत्यू नाही, तर समाजाच्या संगोपन पद्धतीवरचा गंभीर आरोप आहे. किरण बेदींच्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘स्त्रिया कितीही सक्षम असल्या, तरी पुरुष मानसिकदृष्ट्या विकृत असतील तर सुरक्षितता केवळ भ्रम ठरते.’
