कोल्हापूर : कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) हे कायम आपल्या आक्षेपार्ह विधानांमुळे माध्यमांच्या झोतात येत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या अडणतीतही वाढ झाली होती. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायम चर्चेत राहणारे कालीचरण महाराज हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्याचं समर्थन केलं. नथुराम गोडसेनं जे केलं ते योग्यच केलं. नथुराम गोडसे (Nathuram Godse) जेवढे वाचाल, तेवढे तुम्ही गोडसेचे भक्त आणि गांधींचे विरोधक व्हाल, गोडसेंनी गांधींची केलेली हत्या योग्यच असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली असून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कालीचरण महाराज हे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गोडसेचं कौतूक तर महात्मा गांधींवर टीकेची तोफ डागली. कालीचरण महाराज म्हणाले की, नथुराम गोडसेनं जे केलं ते योग्यच केलं. नथुराम गोडसे जेवढे वाचाल, तेवढे तुम्ही गोडसेचे भक्त आणि गांधींचे विरोधक व्हाल. नथुराम गोडसेंना कोटीकोटी नमस्कार. गोडसे नसते तर धर्माचा नाश झाला असता, असं ते म्हणाले.
Rahul Gandhi नावावर केले चार मजली घर; सरकारी बंगला खाली करण्याचा निर्णयावर दिल्लीतल्या महिलेचा निर्णय
दरम्यान, यावेळी बोलतांना कालीचरण महाराजांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधाला. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई ही अतिशय योग्य अशीच आहे. कुठलाही ठोस पुरावा नसतांना कुणाला तीर चोर म्हणणं हा अपराध आहे. जे हिंदूच्या हिताची गोष्ट करत आहेत, ते यांचे शत्रू आहेत. त्यामुळंच ते कायम हिंदूची निंदा करत असतात. मात्र, हिंदु आता पूर्वीसारखा शेळपट राहिला नाही असंही ते म्हणाले.
गोडसेनं गांधींबाबत जे केलं ते योग्यच केलं, असं वक्तव्य करत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींजींच्या हत्येचं समर्थन केल्यानं कोल्हापुरातील प्रागतिक विचारांच्या लोकामध्ये नाराजीचा सुर उमटला आहे.