Supreme Court on Divorce Alimony : घटस्फोट प्रकरणात न्यायालयाने केलेली टीप्पणी (Divorce) सध्या जोरदार चर्चेत आहे, अवघ्या 18 महिन्यांच्या संसारानंतर घेत पतीकडून 12 कोटी रुपयांची पोटगी, बीएमडब्ल्यू कार आणि मुंबईतील घराची मागणी करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोर्टातच कडक शब्दांत फटकारले आहे.
सुप्रीम कोर्टात मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, इतकी सुशिक्षित असताना पतीकडून इतक्या मोठ्या रकमांची मागणी करणं अयोग्य आहे. नोकरी करा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करा. सरन्यायाधीशांनी त्या महिलेपुढं स्पष्ट पर्याय ठेवले, एकतर मुंबईतील घर स्वीकारा किंवा चार कोटी रुपये घेऊन नोकरी शोधा.
ANIच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर; तुरुंगात असलेल्या लष्कर -ए- तोयबाच्या अतिरेक्याकड मोबाईल
महिलेले केलेल्या मागणीवर बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, तुम्ही एमबीए केलं आहे, तुम्ही IT क्षेत्रात काम करता. बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये आयटी प्रोफेशनल्सची खूप मागणी आहे. मग स्वतः नोकरी का करत नाही? यावर महिलेनं सांगितलं की, तिचा पती श्रीमंत आहे आणि त्याने तिला सिजोफ्रेनिया असल्याचं सांगत घटस्फोट घेतला. तुम्हाला मी सिजोफ्रेनिया रुग्ण असल्याचं वाटतं का? असा प्रश्नही त्या महिलेने न्यायालयाला केला. यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की, तुम्ही पतीच्या वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही.
वरिष्ठ वकील माधवी दिवाण यांनी कोर्टात सांगितलं की, महिलेकडं आधीच दोन कार पार्किंग आहेत, त्यातून ती उत्पन्न मिळवू शकते. बीएमडब्ल्यू जी ती मागते आहे, ती गाडी 10 वर्ष जुनी असून स्क्रॅपमध्ये पडली आहे. महिलेनं कोर्टात आणखी आरोप करत सांगितलं की, पतीने तिच्या वकिलालाही मॅनेज केलं आहे. यावर सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट उत्तर दिलं, एकतर घर घ्या किंवा चार कोटी रुपये घ्या आणि स्वतः नोकरी करून आपलं आयुष्य जगा.
महिलेनं शेवटी न्यायालयाला सांगितलं की, तिच्यावर पतीने खोटे आरोप केले आहेत आणि FIR दाखल आहेत. त्यामुळे तिला कुणी नोकरी देणार नाही. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, तुमच्यावरच्या सर्व तक्रारी रद्द करण्यात येत आहेत. आता स्वतःच्या पायावर उभं राहा. तसंच, एवढ्या कमी कालावधीत तुम्ही एवढी मोठी मागणी कशी काय करु शकता? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला. तसंच, पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर तुम्ही दावा करु शकत नाही अशा शब्दात त्या महिलेला फटकारले.