Download App

Video : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ

  • Written By: Last Updated:

Parliament Attack :  संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. संसदेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले असून, ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले असून, खासदार आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं? 

ही घटना बुधवारी दुपारी 1.01  वाजता घडली. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल हे लोकसभेत शून्य प्रहरचे कामकाज चालवत होते. तर, मालदा उत्तरचे भाजप खासदार खगेन मुर्मू  हे विचार मांडत होते. त्याचवेळी अचानक दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडली. या गोंधळाच्या वातावरणात काही खासदारांनी धाडस दाखवत अज्ञाताना घेराव घातला. त्यावेळी तरुणाने बुटाच्या आतून काहीतरी पदार्थ बाहेर काढले जो फवारल्यानंतर सभागृहात पिवळा धूर पसरला. सभागृहात घूसणाऱ्या व्यक्ती म्हैसूरच्या येथील खासदाराच्या नावाने दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने आत आल्याचे सांगितले जात आहे.यातील एका व्यक्तीचे नाव सागर असल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून खासदार आणि मंत्री ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी उड्या मारल्या. त्यावेळी उपस्थित खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर तिसरी व्यक्तीने वरील बाजूने त्याच्याकडील गॅसचा फवारा मारला. यामुळे काहींनी डोळ्यांची जळजळ होत असल्याचे तक्रार केली आहे.

संसदेच्या बाहेर स्मोक जाळणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तरूण 

संसदेच्या आत तिघे घुसल्यानंतर खळबळ उडालेली असतानाच संसदेच्या बाहेर दोघांनी घोषणाबाजी करत स्मोक कँडल जाळली. हे स्मोक कँडल जाळणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचतील तरूणाचा समावेश होता ज्याचे नाव अमोल शिंदे असल्याचे चौकशीतून समोर आले असून, तो लातूरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तर, त्याच्यासोबतची तरूणी हिस्सारची असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

Tags

follow us