भारताजवळ चीनचा ‘टिकिंग बॉम्ब’; महाकाय धरणामुळे भारताच्या दोन राज्यांचा नेपाळ होणार ?

Medog Dam: तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर (Yarlung Tsangpo) चीन 60,000 मेगावॅट क्षमतेचे मेडोग धरण उभारतेय.

Medog Dam

Medog Dam

Ticking Chinese bomb near India: Experts flag China’s monster dam after Nepal devastation : तिबेटमध्ये हिमस्खलनामुळे आलेल्या पुरानंतर नेपाळमध्ये हाहाकार उडाला. 100 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर किमान 750 जण बेपत्ता आहे. हा प्राथमिक आकडा आहे, परंतु नेपाळमध्ये जीवित आणि वित्तहानी मोठी आहे. परंतु भारतासमोर मोठे संकट उभे आहे. हे संकट चीनमुळे उभं राहिलय. अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ उच्च भूकंपीय क्षेत्रात 60,000 मेगावॅट क्षमतेच्या (megawatt (MW)) मेडोग धरण ( Medog Dam) उभारले जात आहे. या धरणाबाबत तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. या धरणाचा भारताला कसा धोका आहे हे जाणून घेऊया..

चीनचे धरण नेमकी कुठे उभारतंय ?
तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर (Yarlung Tsangpo) चीन 60,000 मेगावॅट क्षमतेचे मेडोग धरण उभारतेय. हीच नदी भारतात अरुणाचल प्रदेशातून वाहताना सियांग आणि पुढे आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. चीन हे धरण 2033 पर्यंत उभारणार आहे. मेडोग परिसर भूकंपप्रवण आहे. त्यामुळे या मोठ्या धरणाला तज्ज्ञांनी ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधलंय. चीनच्या सरकारी भूवैज्ञानिक सर्वेक्षणातील शास्त्रज्ञांच्या जुलै महिन्यात अभ्यासातही मेडोग हायड्रोपॉवर प्रकल्पाबाबत केला आहे. भूकंपाशी निगडीत सक्रिय भ्रंशरेषेवर (Active Fault Line) असल्याचे आढळते, असा चीनच्या शास्र्ज्ञांचा अहवाल आहे.नेपाळमधील दुर्घटनेनंतर तज्ज्ञांनी मेडोग धरणाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.


मेडोग धरणाची खर्च किती ?

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 167 अब्ज डॉलर आहे. हे धरण पूर्ण झाल्यानंतर तो चीनच्या थ्री गॉर्जेस धरणापेक्षाही मोठा जलविद्युत प्रकल्प असणार आहे. लोवी इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, त्याची वीज निर्मिती क्षमता थ्री गॉर्जेस धरणाच्या तुलनेत सुमारे तीन पट असू शकते.

हे धरण धोकादायक का ?
रणनीतीविषयक तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी हिमालयातील भूकंपीय धोका अधोरेखित केला. त्यांच्या मते, इंडो-तिबेट सीमेच्या जवळ असलेला हा प्रकल्प भविष्यात भारताच्या ईशान्य भागासाठी मोठा धोका ठरू शकतो. हिमालय हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण प्रमुख पर्वतरांगांपैकी एक आहे. येथे विनाशकारी भूकंप होण्याचा इतिहास आहे, असे चेलानी यांनी म्हटले आहे. तर माजी भारतीय राजदूत राजीव डोगरा यांनीही चीनने हा 60,000 मेगावॅटचा महाकाय प्रकल्प पूर्ण केल्यास भारताच्या ईशान्य भागात मोठ्या विध्वंसाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा प्रकल्प हिमालयातील भूकंपप्रवण पट्ट्यात उभारला जात आहे.याच भागात भारतीय आणि युरेशियन भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळतात. आशियातील काही सर्वात शक्तिशाली भूकंप याच पट्ट्यात झाले आहेत. 2025 मधील विनाशकारी म्यानमार भूकंपाचे हादरे थायलंडपर्यंत जाणवले होते आणि बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली होती, असे डोगरा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


चीनच्या धरणामुळे भारताला चिंता का?

चीनमधून ब्रह्मपुत्रा नदीच्या एकूण पाण्यापैकी तुलनेने कमी पाणी येते. भारतातून ही नदी वाहताना अनेक उपनद्या तिला मिळतात आणि त्यामुळे तिच्या पाण्याचे प्रमाण सहापटापेक्षा जास्त वाढते. यारलुंग त्सांगपो नदी तिबेटमधून भारतातील अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. येथे तिला सियांग या नावाने ओळखले जाते. पुढे आसाममधून वाहताना ती ब्रह्मपुत्रा बनते आणि त्यानंतर बांगलादेशात प्रवेश करते. चीन उभारत असलेले मेडोग धरण यारलुंग त्सांगपो नदीच्या अत्यंत धोक्यादायक भागात आहे. येथे ही नदी तिबेटमधील नामचा बारवा पर्वताभोवती मोठे वळण घेत पुढे जाते. नदी खोल दरीतून मोठ्या उताराने खाली येत असल्याने येथे जलविद्युत निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. चीन या भागात सलग पाच जलविद्युत प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे. या प्रकल्पाचा प्रचंड आकार आणि त्याचे भौगोलिक स्थान भारतासाठी चिंतेचा विषय आहे. भविष्यात भारताकडे किती पाणी सोडायचे याचे नियंत्रण चीनकडे जाईल. त्यामुळे जास्त पाणी सोडल्यास भारतात पूर येईल आणि कमी पाणी सोडल्यास पाणीटंचाई जाणवेल. अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यावर त्याचा परिणाम होईल.

भारताकडून काय उपाययोजना ?
या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी भारतही काही उपाययोजना करतंय. अरुणाचल प्रदेशातील सियांग नदीवर 11,000 मेगावॅटचा सियांग अप्पर मल्टिपर्पज प्रकल्प उभारला जाणार आहे. चीनच्या वरच्या भागातील धरणांमुळे पाण्याच्या प्रवाहात होणाऱ्या संभाव्य बदलांना सामोरे जाण्यासाठी हा प्रकल्प आहे. भारत आणि चीनमध्ये सीमापार नद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक जलवाटप करार नाही. त्यामुळे जलविषयक माहितीची देवाणघेवाण करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे भूकंपप्रवण भागात उभारले जाणारे हे प्रचंड धरण भारतासाठी अधिक चिंतेचा विषय बनले आहे. मेडोग धरणाला तज्ज्ञ ‘वॉटर बॉम्ब’ म्हणतात. कारण या धरणाचा प्रचंड मोठा आकार, भूकंपप्रवण ठिकाण आणि भारताच्या ईशान्य भागावर होणारा संभाव्य परिणाम ही प्रमुख कारणांमुळे या धरणाला वॉटर बॉम्ब म्हटले जात आहे.

Exit mobile version