Download App

‘महिलांना राजनीतीची भाकरी बनवून शेकण्याचं काम’, अविश्वास प्रस्तावाला राणांचा कडाडून विरोध

Navneet Rana : महिलांना राजनीतीची भाकरी बनवून शेकण्याचं काम विरोधकांकडून सुरु असल्याचा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या अधिवेशनात केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर अधिवेशनात चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान राणांनी घणाघात करीत अविश्वास प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे.

उबाठा आणि मनसे एकत्र येणार का? मनसेच्या अमेय खोपरकरांनी स्पष्टच सांगितलं…

पुढे बोलताना राणा म्हणाल्या, आम्ही महिला, आई, नंतर खासदार आहोत. अधिवेशनात सकाळापासून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. महिलांविषयी सहानूभूतीचा एकही शब्द विरोधकांकडून ऐकण्यात आला नाही.
मणिपूर महिला अत्याचाराची घटना निषेधच आहे.

‘मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतोय’; शेलारांची टीकेवर दानवेंचा घणाघात

4 मेच्या घटनेला जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विचारलं जातं आहे, एक दिवस आधी पत्रकारंकडून बातमी दाखवली जात आहे. ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले सभागृहात हे प्रकरण आणण्याचं काम विरोधी पक्षाने केलंय त्यावर चौकशी व्हायला हवी, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, महिलांवरील अत्याचार मीडिया, समाजमाध्यमांवर आणला जात आहे, त्याचा निषेध असून विरोधी पक्षाचे नेते राजस्थानच्या घटनेवर बोलत नाहीत. राजस्थानात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला कोळशात फेकलं जात कोणीच नाही बोलत? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे. तसेच महिलांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us